लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहेत अनेक ठिकाणी प्रचार सभा, रोड शो सुरु आहेत.महाराष्ट्रातही प्रचाराने जोर धरला असून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंना बाहेर थांबा असे शरद पवार म्हणत आहे काय आहे व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचाराने जोर धरला असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे यांना "कृपया बाहेर थांबा" असे सांगत आहेत.
व्हिडिओमध्ये शरद पवारांच्या या म्हणण्यावर उद्धव ठाकरे हात जोडून "मी आजूबाजूलाच आहे" असं उत्तर देत तेथून निघताना दिसत आहेत.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे हावभाव जरी साधारण असले तरी, भाजप सत्ताधार्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला असून अनेकांनी या व्हिडिओचा निष्कर्ष लावला आहे की, हा उद्धव ठाकरेंचा अपमान आहे. हा व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते जितेन गजरिया यांनी कॅप्शन देत म्हंटले आहे की, शरद पवार विनम्रपणे उद्धव ठाकरेंना व्यस्त असल्याने बाहेर जाण्यास सांगत आहेत.
तर दुसऱ्या एका नेटकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत म्हंटले आहे की, अशा पद्धतीने शरद पवार यांच्याकडून उद्धव ठाकरेंना वागणूक मिळत आहे.यावरून सोशल मीडियावर राजकारण चांगलाच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच पेटले आहेत.
नेमकी व्हिडिओमध्ये काय आणि त्याचा अर्थ काय ?
X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यावरून सुरु असलेल्या वादंगात नेमकी व्हिडिओमध्ये काय आणि त्याचा अर्थ काय हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. राईटविंगकडून या व्हिडिओच्या माध्यमातून ओव्हरड्राईव्ह करत आहेत, मात्र व्हिडिओला जवळून पाहिल्यावर यात दिसून येते की, शरद पवार उद्धव ठाकरेंना काही वेळासाठी विशिष्ट ठिकाणी थांबण्यास सांगत आहेत. यावर उद्धव ठाकरे देखील म्हणतात की, “मी आजूबाजूलाच आहे”.
लोकसभा निवडणूक आणि मुंबई :
निवडणुकीची धामधूम सुरू असताना हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांना विरोधकानावर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र याचा काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही. मुंबई मध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे राजकीय तापमानाचा पारा देखील वाढला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती प्रचारात उतरले आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस असून महायुतीमध्ये भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत उतरली आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत प्रचार करताना दिसत आहेत.
आणखी वाचा :
असदुद्दीन ओवैसींविरुद्ध लढणाऱ्या माधवी लता किती श्रीमंत ?