Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांचा BJP ला रामराम, राजीनाम्यानंतर शरद पवारांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मोहिते पाटलांच्या राजीनाम्यामागील कारण देखील समोर आले आहे. सूत्रांनुसार, धैर्यशील मोहिते पाटील शरद पवरांच्या गटात सहभागी होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. 

Maharashtra Lok Sabha Election  2024 : भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या (BJP) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपने माढा लोकसभेच्या जागेवरुन (Madha lok sabha seat) तिकीट कापल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. या जागेवर धैर्यशील मोहिती पाटलांएवजी रणजीत सिंह निबांळकर (Khasdar Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, भाजपावर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी पुण्यात शरद पवारांची (Shard Pawar) भेट घेतली. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. अशीही चर्चा सुरू झालीय की, धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या गटात सहभागी होऊ शकतात. याशिवाय शरद पवारांकडून माढा येथून धैर्यशील पाटलांना निवडणुकीचे तिकीट दिले जाईल असेही बोलले जात आहे. 

रणणजीत सिंह निबांळकरांना भाजपने दिले तिकीट
भाजपाने रणजीत सिंह निबांळकर यांना माढ्यातून तिकीट दिल्याने मोहिते पाटील नाराज झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी मोहिते पाटलांची समजून काढण्याचा प्रयत्नही केला होता. यानंतर नुकतीच मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर धैर्यशील मोहीते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी म्हटले की, वाट पाहतोय. खरंतर, मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या कुटुंबाचे जुने नातेसंबंध आहेत. यामुळेच कोणीही आमच्या भेटीमुळे आश्चर्य होण्याची गरज नाही असेही मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया
शरद पवारांनी गुरुवारी (11 एप्रिल) पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले की, धैर्यशील मोहिते पाटील आमच्या गटात सहभागी होणार आहेत. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्ष प्रवेश होणार आहे. मोहिते पाटील गटात सहभागी होण्याआधी शरद पवारांची माढ्यातील अकलुज येथे रॅली असणार आहे. त्यानंतर मोहिते पाटलांचा पक्षात प्रवेश होणार आहे. याशिवाय सोलापूर येथून निवडणूक लढवत असलेल्या प्रणिती शिंदे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Dhairyasheel Mohite Patilyancha bjp la ramram)

दरम्यान, शरद पवार यांच्या गटाने बुधवारी (10 एप्रिल) पक्षाची तिसरी उमेदवार यादी जारी केली. यामध्ये शशिकांत शिंदे यांना सातारा आणि श्रीराम पाटील यांना रावेर, जळगाव येथील जागेवरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

सात टप्प्यात होणार निवडणूक
देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जूनला जाहीर केले जाणार आहेत.

आणखी वाचा : 

वर्ध्यातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेचे परिवारावर गंभीर आरोप, पत्रकार परिषद घेत म्हणाल्या....

सातारा लोकसभेतून कोणाला मिळणार तिकीट? उदयनराजे भोसले यांच्या नावावर भाजप करणार शिक्कामोर्तब

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे विश्वजित कदम नाराज, विशाल पाटील अपक्ष उमेदवारी दाखल करणार

Read more Articles on
Share this article