Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहीण योजना' कधीही बंद होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. ही योजना बहिणींसाठी दिवाळीची 'भाऊबीज' असून, ती अविरत सुरू राहील, असे त्यांनी साताऱ्यातील कार्यक्रमात सांगितले.
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे, “जोपर्यंत देवाभाऊ, शिंदे साहेब आणि अजित दादा आहेत, तोपर्यंत ‘लाडकी बहीण योजना’ कधीच बंद होणार नाही!” ते साताऱ्यातील फलटण येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
25
दरमहा 1500 रुपये आणि महिलांची वाट पाहणारी भाऊबीज
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 इतकी आर्थिक मदत दिली जाते. ऑक्टोबरचा हप्ता अजून थकबाकीत असताना महिलांमध्ये उत्सुकता होती की, पैसे खात्यात कधी जमा होतील? त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “लाडकी बहीण योजना ही आमच्या बहिणींसाठी दिलेली दिवाळीची ‘भाऊबीज’ आहे. ती सातत्यानं मिळत राहील, याची मी हमी देतो.”
35
शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटींचं पॅकेज, फडणवीसांचा दावा
फडणवीस म्हणाले, “आमचं महायुतीचं सरकार विकासाभिमुख आहे. राज्यातील दुष्काळी भागातला दुष्काळ दूर करण्यासाठी आम्ही झटतो आहोत. शेतकऱ्यांच्या संकट काळात आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठं ₹32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज आम्ही जाहीर केलं आहे. आणि त्या निधीचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतो आहे.”
ते पुढे म्हणाले, “कुठल्याही परिस्थितीत आमचं सरकार सुरू केलेल्या योजना बंद होऊ देणार नाही. काही लोकं अफवा पसरवतात की ‘लाडकी बहीण योजना बंद होणार’, पण हे पूर्णतः चुकीचं आहे.”
फडणवीस यांनी कार्यक्रमात पुढे सांगितले, “राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली वीजसवलत पुढील पाच वर्षे कायम राहील. शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही. आणि जर लोकांनी पुन्हा आमचं सरकार निवडून दिलं, तर ही सवलत आणखी पाच वर्षांसाठी वाढवू.”
त्यांनी पुढे सांगितलं, “सौरऊर्जाकरणामुळे 2026 च्या डिसेंबरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाचे 12 तास मोफत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. सर्व उपसा सिंचन योजना सोलर उर्जेवर नेल्या जातील, ज्यामुळे विजेच्या थकबाकीचं संकट कायमचं संपेल.”
55
महिलांसाठी आशेचा किरण, सरकारकडून हमी
फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातील महिलांना दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता असून, योजनेत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास अधिकाऱ्यांकडूनही व्यक्त केला जातो आहे.