Kolhapur Rain : कोल्हापुरात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली

Published : Jul 07, 2026, 09:22 AM IST
Kolhapur Rain

सार

राज्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अशातच कोल्हापूरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून तेथील स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.

मुंबई : कोल्हापुरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. याचे ड्रोन फुटेज समोर आले आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पाण्यात वाढ झाली. यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. रस्तेही जलमय झाले आहेत.

पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापुरातील पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे सखल भागात पुराचे पाणी शिरल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबत जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक पुलही पाण्याखाली गेल्याची स्थिती आहे.

तीन राज्य महामार्ग बंद

जिल्ह्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येथील तीन राज्य महामार्ग बंद करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील काही भागामधील संपर्क तुटलेला आहे. तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची स्थिती आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

 

रेड अलर्ट जारी

कोल्हापुरसाठी आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक