Maharashtra Rain Update : राज्यातील या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Published : Jul 07, 2026, 08:18 AM IST
delhi rain

सार

राज्यामध्ये पावसाच्या धुमशानामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच हवामान खात्याकडून येत्या ८ जुलैपर्यंत अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील एकूणच पावसाची स्थिती पाहता जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा जोर आज पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यासोबत नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर आजही राज्यातील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रेड अलर्ट जारी

कोकण, घाटमाथा, पालघर आणि पुणे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठाणे, मुंबईतील पावसाचा अंदाज

ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. येथे आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

 

 

मराठवाड्यातील स्थिती

छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, जालना आणि धाराशीव या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावतीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे-मुंबई मार्गावरील 17 गाड्या रद्द

पुणे-मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या 17 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अद्याप रुळांवर कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे नागरिकांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम

पावसामुळे ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलन, नद्यांना पूर आल्याची स्थिती आहे. या ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात केली आहेत. तसेच मुंबईतील खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा देण्याचा सल्ला स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक