धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, करुणा शर्मा यांनी केले आरोप

Published : May 30, 2025, 10:14 PM IST
Dhananjay Munde

सार

समाजसेविका करुणा शर्मा यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आव्हान दिले आहे. शर्मा यांनी पुरावे असल्याचा दावा केला असून, मुंडे यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुंबई | प्रतिनिधी राजकारणात आरोप-प्रत्यारोप नवे नाहीत, पण यावेळी समाजसेविका करुणा शर्मा यांनी थेट राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तुफान आरोप करत, त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

“या वेळेस मी थांबणार नाही...”

करुणा शर्मा म्हणाल्या, “धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. यावेळी मी गप्प बसणार नाही. त्यांच्या राजकारणाची पूर्ण हकालपट्टी होईपर्यंत मी थांबणार नाही.”

काय आहेत आरोप?

करुणा शर्मा यांनी आधीही धनंजय मुंडेंवर वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर गंभीर आरोप केले होते. मात्र यावेळी त्या अधिक आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी असेही सांगितले की, "लोकांना सत्य समजायला हवे. राजकारण म्हणजे फसवणूक, गुंडगिरी, आणि लोकशाहीची थट्टा नव्हे."

‘पुरावे सादर करणार’

शर्मा पुढे म्हणाल्या की, "माझ्याकडे पुरावे आहेत जे लवकरच समाजासमोर येतील. फक्त राजकीय प्रतिष्ठेसाठी गुन्हेगार वाचवले जाऊ नयेत. कोणत्याही पदाचा दुरुपयोग खपवून घेतला जाणार नाही."

धनंजय मुंडे गप्प – पण चर्चेत

या संपूर्ण प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी अद्याप मौन बाळगले आहे. मात्र करुणा शर्मांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर दबाव वाढताना दिसतोय. विरोधी पक्ष आणि माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा