हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक पोलीस अधिकारी सुपेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Published : May 30, 2025, 10:03 PM ISTUpdated : May 30, 2025, 10:17 PM IST
supekar and hagwane

सार

पुण्यातील हगवणे बंधूंना मिळालेल्या शस्त्र परवान्यावर तत्कालीन उपायुक्त जलिंदर सु्पेकर यांची सही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सु्पेकर यांनी मात्र या प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पुणे | प्रतिनिधी शस्त्र परवान्यासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील हगवणे बंधूंना देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यावर तत्कालीन उपायुक्त जलिंदर सु्पेकर यांची सही आढळल्याने चर्चांना आणि शंका-अपशंकांना चर्चांना संधी मिळाली आहे. हगवणे कुटुंबातील शंशाक आणि सुशील हगवणे या दोघांना शस्त्र परवाने मिळाले आहेत. विशेष म्हणजे, या परवान्यांवर उपायुक्त सु्पेकर यांच्या सहीचे पुरावे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. परंतु, सु्पेकर यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सु्पेकरांची भूमिका

“शस्त्र परवाने देण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जाते. मी काही परवाना मंजूर केला नसल्याचे माझ्या माहितीप्रमाणे स्पष्ट होत आहे. माझ्या सहीचा गैरवापर झाला असल्याची शंका आहे,” असं स्पष्टीकरण सु्पेकर यांनी दिलं आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या घडामोडींमुळे प्रशासनाच्या शस्त्र परवाना प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. दस्तऐवजांवरील सह्यांचा दुरुपयोग, अधिकाऱ्यांची नामधारी सही आणि संभाव्य राजकीय हस्तक्षेप यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांची चौकशी सुरू

या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांनी सुरू केली असून संबंधित दस्तऐवज आणि सहीच्या अधिकृततेची सखोल तपासणी केली जात आहे. जर हस्ताक्षर तज्ज्ञांद्वारे सही बनावट असल्याचे सिद्ध झाले, तर फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Satbara Utara : सातबारा उताऱ्यात या नोंदी दिसल्या तर सावध! जमीन जप्तीपासून कारवाईपर्यंत मोठे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जमीन वापर नियमांत ऐतिहासिक बदल! ‘सनद’ची अनिवार्यता रद्द; नागरिक–बिल्डर्स–जमीनधारकांना मोठा दिलासा