Kalyan Building Slab Collapse ४ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू

Published : May 21, 2025, 08:26 AM ISTUpdated : May 21, 2025, 09:16 AM IST
Kalyan Building Slab Collapse

सार

Kalyan Building Collapse : कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा परिसरातील सप्तश्रृंगी नावाची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय. 

Kalyan Building Collapse : कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा परिसरात मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. धोकादायक ठरलेली ‘सप्तशृंगी’ नावाची चार मजली इमारत कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

ही दुर्घटना मंगळवारी दुपारी १:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. जोरदार आवाज झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.

दुर्घटनेतील मृत व्यक्तींची नावे:

  • प्रमिला साहू (५८)
  • नामस्वी शेलार (२)
  • सुनीता साहू (३७)
  • सुजाता पाडी (३२)
  • सुशीला गुजर (७८)
  • व्यंकट चव्हाण (३२)

जखमींची नावे:

  • विनायक पाडी (४)
  • शार्विल शेलार (४)
  • अरुणा गिरनारायणा
  • यश क्षीरसागर (१३)
  • श्रद्धा साहू (१४)
  • निखिल खरात

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि केडीएमसीचे अधिकारी तत्काळ दाखल होऊन मदतकार्य सुरू केले.सदर इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती आणि त्यामध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, याच दरम्यान ही जीवघेणी दुर्घटना घडली.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. तसेच, जखमींवर योग्य ती वैद्यकीय मदत दिली जात असून, जिल्हा प्रशासन या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून धोकादायक इमारतींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!