IAS पूजा खेडकर यांची वाशिमला केली उचलबांगडी, सरकारी अधिकार वापरून ऑफिसही बळकावले

पूजा खेडकर या प्रशासकीय अधिकारी असून त्यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत आले आहे. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ड्युटीवर असताना त्यांनी त्यांच्या अधिकार कक्षाबाहेर जाऊन काम केल्याचा पुरावा त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

vivek panmand | Published : Jul 9, 2024 10:07 AM IST

पूजा खेडकर या प्रशासकीय अधिकारी असून त्यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत आले आहे. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ड्युटीवर असताना त्यांनी त्यांच्या अधिकार कक्षाबाहेर जाऊन काम केल्याचा पुरावा त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता त्यांची वाशीम येथे बदली करण्यात आली असून त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याचा हे फळ देण्यात आल्याचं म्हणण्यात येत आहे. 

पूजा खेडकर यांच्यावर कोणते आहेत आरोप - 
यावेळी पूजा खेडकर यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चेंबर बळकावणे, खाजगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावणे, गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावणे यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची पुण्यामध्ये प्रोबेशन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 

वडिलांनी कोणाला दिला होता दम? - 
पूजा खेडकर यांच्या वडिलांनी प्रशासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांनी चौथ्या मजल्यावरील एक ऑफिस स्वतःच्या खाजगी बैठकीसाठी शोधून काढले. त्यावेळी त्यांना ही बैठक व्यवस्था नको वाटायला लागली. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी तहसीलदारांना तुम्ही तुमची संपूर्ण शासकीय सेवा पूर्ण होईपर्यंत अप्पर जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचू शकणार नाही. खेडकर मॅडम येण्या आधीच त्यांची सर्व व्यवस्था होणे अपेक्षित होते. सर्व बैठक व्यवस्था केल्याशिवाय जायचे नाही " असा दम भरला होता. 

वडिलांनी कामात आणला व्यत्यय - 
पूजा खेडकर यांनी कामामध्ये सातत्याने व्यत्यय आणल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी आपल्या मुलीला बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय का मिळत नाही अशी सातत्याने चौकशी केली. यावेळी त्यांनी येथे असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांना दम भरल्याचे सांगितले आहे. पूजा खेडकर यांनी स्वतःच्या कार्यलयात फर्निचर आपल्या पैशातून बनवल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच्यातील इंटेरियर बदलल्याची माहिती देण्यात आली आहे. 
आणखी वाचा - 
 Sudhakar Bhalerao Join Ncp Sharad Pawar Group : लातुरात शरद पवारांचा भाजपला 'मोठा धक्का', माजी आमदार तुतारी हाती घेणार
Nagpur Hit And Run Accident : नागपुरात भरधाव बसने सायकलवरुन जाणाऱ्या वृद्धाला चिरडले, घटना CCTV मध्ये कैद

Share this article