प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठ्या प्रमाणावर टीका झाली. पोलीस त्यांना पकडण्यासाठी जात असताना त्या महाड येथील लॉजमध्ये "इंदुबाई" नावाचे बनावट आधारकार्ड दाखवून लपल्या.
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्याबाबतचे रोज नवीन खुलासे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा काही दिवसांपूर्वी हातात बंदूक घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे दिसून आले होते.त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला सुरुवातही झाली. त्यांना पोलीस पकडायला जात असताना त्या महाड येथे जाऊन बसल्या होत्या.
महाड येथील लॉजमध्ये बसल्या होत्या जाऊन -
महाड येथील लॉजमध्ये मनोरम खेडकर यांनी इंदुबाई नावाचे आधारकार्ड दाखवल्यामुळे त्यांच्यावर कोणालाही संशय आला नाही. लॉज असणाऱ्या मालकाला हेच आधार कार्ड दाखवले, त्यामुळे त्यानेही कोणताच संशय घेतला नाही. पण त्यांनी एक कॉल केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी कॅब बुक करून त्या महाडला जाऊन पोहचल्या होत्या.
कॅबचालकाचे आधार कार्ड घेतले -
कॅबचालकाचे आधार कार्ड घेतल्यामुळे इंदुबाई यांच्यावर कोणी संशय घेऊ शकत नव्हते. त्यांनी त्याच्या आधारकार्डमध्ये गुपचूप इंदुबाई हे नाव घालून ते आधारकार्ड लॉज मालकाला दाखवले. त्याने ते पाहून त्यांना लॉजमध्ये राहण्याची परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी कॉल लावल्यामुळे पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळाले आणि त्यामुळे पोलीस डायरेक्ट लॉजच्या दारात रात्री साडेतीन वाजता जाऊन पोहचले. पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचे आरोप केले आहेत. खेडकर यांना पुणे येथे हजर राहण्याची सूचना देण्यात आली असून त्या न गेल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी वाशीम पोलीस जाऊन पोहचले आहेत.
आणखी वाचा -
मध्य रेल्वे मार्गावर 20 जुलैला रात्री स्पेशल ब्लॉक, पाहा गाड्यांचे वेळापत्रक
पूजा खेडकर यांनी केली अजून एक फसवणूक, अपंगत्व प्रमाणपत्रात कोणता टाकला पत्ता?