Gautami Patil: गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज समोर आले, ज्यात अपघातापूर्वी २ व्यक्ती गाडीतून उतरताना दिसत आहेत. या घटनेमुळे गौतमी गाडीत होती की नाही याबाबत संशय निर्माण झाला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पुणे: नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात आता एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात, अपघाताच्या काही क्षण आधी गाडीतून दोन व्यक्ती उतरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे चौकशीला नवं वळण मिळालं असून, गाडीत अपघाताच्या वेळी गौतमी पाटील होती का? यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.
25
काय आहे प्रकरण?
30 सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रिक्षाला मागून जोरदार धडक बसली. ही धडक गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या गाडीने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. रिक्षाचालक सामाजी मरगळे हे अजूनही पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
35
पेट्रोल पंपावरचं सीसीटीव्ही फुटेज, अपघातापूर्वी उतरले दोन जण
भोरहून मुंबईकडे जात असताना, गौतमी पाटीलचं वाहन पेट्रोल पंपावर थांबलेलं दिसतं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चालकाशेजारी आणि मागील सीटवर बसलेल्या दोन व्यक्ती वाहनातून खाली उतरल्याचे दिसून येतं. अपघात या पेट्रोल पंपाच्या काही अंतरावरच झाल्याने, या उतरलेल्या व्यक्तींची ओळख लावण्याचा आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध तपासण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, मात्र सीसीटीव्हीच्या आधारे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मरगळे कुटुंबीयांनी भेट घेतली आणि चौकशीसाठी मागणी केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी चौकशीला वेग दिला असून, या प्रकरणासाठी एक विशेष अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी कुठून आली, क्रेन कोणी बोलावली, फोन कुणी केला या सर्व बाबींचा तपास सुरू आहे, आणि त्यासंबंधीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज रिक्षाचालकाच्या मुलीला दाखवण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
55
उपचार खर्च भयंकर, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रयत्न
रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या उपचारासाठी दररोज 70-80 हजार रुपये खर्च होत असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक खर्च झाला असून, पुढील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसह इतर योजनांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.