Gautami Patil: गौतमी पाटीलवर अपघात प्रकरणी पोलीस कारवाई शक्य नाही, पोलीस उपायुक्तांनी काय कारण सांगितले?

Published : Oct 05, 2025, 07:02 PM IST

Gautami Patil: पुण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या कारने रिक्षाला धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. या प्रकरणी चालकाला अटक झाली असली तरी, कायद्यानुसार गाडी मालकावर (जो गाडीत नव्हता) थेट गुन्हा दाखल करता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

PREV
15
गौतमी पाटीलवर कारवाई होणार का?

Gautami Patil: पुणे शहरात घडलेल्या एका गंभीर अपघातात नृत्यांगना गौतमी पाटील हिचं नाव समोर आल्यानंतर वाद वाढले आहेत. मात्र, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केलं आहे की, गौतमी पाटीलवर कोणतीही थेट कारवाई शक्य नाही, कारण कायद्यानुसार को-पॅसेंजरवर (सहप्रवासी) गुन्हा नोंदवता येत नाही. 

25
नेमका काय आहे अपघाताचा प्रकार?

30 सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात, मुंबई-बंगळूर महामार्गावर एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्या रिक्षामध्ये चालकासह दोन प्रवासी होते. भरधाव वेगात आलेल्या कारने रिक्षाला जबर धडक दिली, ज्यामुळे रिक्षाचालक आणि दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले. या गाडीचा मालक गौतमी पाटील असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, पण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 30 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली आहे. 

35
मंत्री चंद्रकांत पाटलांचा हस्तक्षेप, पण...

रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात कोथरूडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून चौकशीची मागणी केली. 

मात्र, पोलिसांनी स्पष्ट केलं की, गौतम पाटील त्या वेळी गाडीत होती की नाही, याचा तपास सुरू आहे, आणि चालकावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. परंतु, केवळ गाडी तिच्या नावावर असल्यामुळे गौतमीवर थेट कारवाई शक्य नाही. 

45
गौतमी पाटीलकडून सहकार्य, चौकशीची शक्यता

गौतमी पाटीलने पोलिसांना गाडीची संपूर्ण कागदपत्रं सादर केली असून, गरज भासल्यास तिला चौकशीसाठी बोलावण्यात येईल. मात्र, सध्या तरी ती चौकशीच्या कक्षेत नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

55
अपघातग्रस्तांचा आरोप काय?

रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत, म्हणाले की,

अपघातानंतर गौतमीच्या टीमकडून कोणतीही मदत मिळाली नाही

पोलिसांकडूनही योग्य सहकार्य नाही, सीसीटीव्ही फुटेज उशिरा दिलं जातं

गौतमी पाटील जबाबदारी झटकते आहे

या पार्श्वभूमीवर प्रकरणाचा तपास सुरू असून पारदर्शकता राखली जात आहे, असं डीसीपी कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories