भूमी अभिलेख विभागात 'भूकरमापक' (Surveyor) या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
10वी (माध्यमिक शाळा परीक्षा) उत्तीर्ण.
मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा,
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
याशिवाय, उमेदवाराकडे मराठी टायपिंग 30 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM गतीचे प्रमाणपत्र (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र) असणे आवश्यक आहे.