सकाळीच विदर्भाला बसले भूकंपाचे झटके, हिंगोली आणि वाशिममध्ये सर्वात जास्त भूकंपाची तीव्रता

महाराष्ट्रामध्ये सकाळीच भूकंपाचे धक्का बसले असून यामुळे सगळे हादरून गेले आहेत. या घटनेमुळे सगळीकडचे वातावरण ढवळून निघाले आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथेही या भूकंपामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे.

vivek panmand | Published : Jul 10, 2024 4:32 AM IST

महाराष्ट्रामध्ये सकाळीच भूकंपाचे धक्का बसले असून यामुळे सगळे हादरून गेले आहेत. या घटनेमुळे सगळीकडचे वातावरण ढवळून निघाले आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथेही या भूकंपामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. हिंगोली येथे झालेला या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून यामुळे येथील लोकांना कापरे भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

विदर्भातील भूकंपाच्या धक्याचा व्हिडीओ आला समोर - 
विदर्भातील हिंगोली शहराला या भूकंपाचे धक्के मोठ्या प्रमाणावर बसल्याचे सांगण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यामधील पाचही तालुक्यांमध्ये हा भूकंप झाला असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाबरत पसरली आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडीओ हा १९ सेकंदाचा व्हायरल झाला असून धरणीकंप झाल्याचे दिसून आले आहे. 

भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर - 
भूकंपाचा धक्का हा हिंगोली आणि परिसराला बसला असून या रस्त्यावरील दुकाने मोठया प्रमाणावर बंद करण्यात आल्याचे दिसून आले आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्हीमध्ये या परिसराला धक्का बसत असून छताला अडकवलेला पंखा हलत असल्याचे दिसले आहे. या व्हिडीओमुळे भूकंप किती भयंकर असेल हे लक्षात येऊ शकते. 

वाशीम जिल्ह्याला बसला फटका - 
हिंगोली जिल्ह्यासोबतच वाशीम जिल्ह्याला या भूकंपाचे फटाके बसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील नागरिकांमध्ये घाबरत निर्माण झाली आहे. या जिल्ह्यात दोन वेळा भूकंपाचे झटके बसले असून येथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सगळीकडे याच चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Share this article