‘फक्त फोटोसाठी मला बोलावू नका’; गडकरींचा भूमिपूजनांवरुन संताप

Published : May 09, 2025, 04:00 PM IST
Nitin Gadkari

सार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हार-नांदूर शिंगोटे रस्त्याच्या भूमिपूजनावरून प्रशासनाला इशारा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले असूनही काम सुरू न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

माझ्या नावाचा वापर करून भूमिपूजन करायचं आणि नंतर कामचं सुरू करायचं नाही? मग मला का बोलावता?" — अशा थेट शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला आणि संबंधित यंत्रणांना जणू इशाराच दिला आहे. कोल्हार-नांदूर शिंगोटे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून गडकरी यांनी व्यक्त केलेली नाराजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "माझ्या उपस्थितीत भूमिपूजन झाल्यानंतर जर कामच लांबते, तर अशा कार्यक्रमाला मला निमंत्रण देऊ नका." त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रशासनातील हलगर्जीपणावर बोट ठेवलं गेलं आहे. या रस्त्याचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी झाले, पण अद्याप काम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर गडकरींची ही प्रतिक्रिया म्हणजे विकासकामातले दिरंगाई आणि आश्वासनांची पूर्तता न होणे यावरचा रोष आहे, असे स्पष्ट दिसते.

गडकरी हे कामाच्या अचूक वेळापत्रकासाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीत अडथळे आले की, ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे यावेळचा त्यांचा इशारा संबंधित यंत्रणांसाठी एक सिग्नलच मानला जात आहे.

PREV

Recommended Stories

ST Bus Fare Hike : प्रवाशांना महागात बसणार एसटीचा प्रवास! लालपरीपासून शिवनेरीपर्यंत वाढले तिकीट दर
पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० दिवसांचा ‘मेगाब्लॉक’; अमरावती-नागपूरसह ११ गाड्या रद्द