ढगाळ वातावरणानंतर अखेर पुण्यात दमदार पावसाची एन्ट्री, उकाड्याला ब्रेक, हवेत गारवा!

Published : May 09, 2025, 03:41 PM ISTUpdated : May 09, 2025, 03:47 PM IST
kolkata Rain

सार

पुण्यात आज जोरदार पाऊस झाला आहे, ज्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. राज्यात बुधवारी व गुरुवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात घट झाली असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

पुणे: गेले काही दिवस ढगाळ वातावरणाची चाहूल लागल्यानंतर अखेर पुण्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासूनच गार वाऱ्यांची झुळूक आणि ढगांनी व्यापलेले आकाश पाहायला मिळाले. काही भागांत ऊनसावल्याचा खेळ सुरू असतानाच अचानक पावसाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

पावसामुळे शहरात वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक प्रवाशांना रस्त्याच्या कडेला थांबून आसरा घ्यावा लागला. दुचाकीस्वारांची विशेष तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तापमानात लक्षणीय घट

राज्यात बुधवारी व गुरुवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कमाल तापमानात तब्बल 8 ते 10 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. पुण्यासह इतर शहरांमध्ये सुद्धा दिवसभर गार वारे वाहत असल्याने उकाड्याची झळ कमी झाली आहे.

‘यलो अलर्ट’ जारी, या भागांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे:

पुणे: 9 ते 12 मे

धुळे, जळगाव, अहिल्यानगर, कोल्हापूर: 9 ते 12 मे

सातारा: 10 ते 12 मे

छ. संभाजीनगर: 9 ते 11 मे

अकोला, भंडारा: 10 ते 12 मे

बुलडाणा, वाशिम, यवतमाळ: 11 व 12 मे

गडचिरोली, चंद्रपूर: 9 ते 12 मे

गोंदिया: 10 व 11 मे

नागपूर, वर्धा: 9 ते 11 मे

राज्यात 24 तासांत झालेला पाऊस (मी.मी मध्ये):

मुंबई: 18.5

रायगड: 13.5

लोणावळा: 3.5

कर्जत: 2.5

पुणे: गिरीवन (2.5), लवासा (4), तळेगाव (3.5), माळीन (7.5), निमगिरी (10.5)

नाशिक: 18

संपूर्ण राज्यात वातावरणात आलेल्या या बदलामुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत हवामानात अधिक बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर ते तिरुपती, थेट दर्शनासाठी विशेष रेल्वे! संपूर्ण वेळापत्रक लगेच पाहा!
‘आवडेल तिथे प्रवास’ आता आणखी स्वस्त! एसटी महामंडळाकडून पास दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर