Diwali Special Train: दसरा-दिवाळीत नागपूरकरांसाठी रेल्वेची खास भेट, मुंबई आणि पुण्यातून 40 विशेष गाड्या धावणार!

Published : Sep 08, 2025, 05:03 PM IST

Diwali Special Train 2025: नवरात्र, दसरा, दिवाळीनिमित्त नागपूरसाठी मुंबई, पुण्याहून ४० विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. हे विशेष गाड्या सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान धावतील आणि प्रवाशांना सणासुदीच्या काळात त्यांच्या मूळगावी पोहोचण्यास मदत करतील.

PREV
16

Diwali Special Train 2025: शारदीय नवरात्र, दसरा आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांचा आनंद आपल्या मूळगावी साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांतून लाखो प्रवासी गावाकडे रवाना होतात. या सणासुदीच्या काळात रेल्वे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो आणि तिकिटांसाठी झुंबड उडते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेकडून दसरा-दिवाळी स्पेशल ट्रेन्सची घोषणा करण्यात आली असून, यंदा नागपूरसाठी मुंबई आणि पुण्यातून प्रत्येकी 20 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

26

नागपूर-पुणे विशेष गाडी वेळापत्रक

गाडी क्रमांक 01209 – नागपूर ते पुणे

प्रवास कालावधी: 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर 2025

गाडी सुटण्याचा दिवस: प्रत्येक शनिवार

वेळ: सकाळी 11:40 वाजता नागपूरहून प्रस्थान

36

गाडी क्रमांक 01210 – पुणे ते नागपूर

प्रवास कालावधी: 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025

गाडी सुटण्याचा दिवस: प्रत्येक रविवार

वेळ: दुपारी 3:50 वाजता पुण्याहून प्रस्थान

थांबे: उरळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर (अहिल्यानगर), बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव, वर्धा

46

लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडी वेळापत्रक

गाडी क्रमांक 02139 – LTT (मुंबई) ते नागपूर

प्रवास कालावधी: 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर 2025

गाडी सुटण्याचा दिवस: प्रत्येक गुरुवार

वेळ: दुपारी 12:25 वाजता LTT वरून प्रस्थान

56

गाडी क्रमांक 02140 – नागपूर ते LTT (मुंबई)

प्रवास कालावधी: 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर 2025

गाडी सुटण्याचा दिवस: प्रत्येक शुक्रवार

वेळ: दुपारी 1:30 वाजता नागपूरहून प्रस्थान

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, वडनेरा, धामणगाव, वर्धा

66

सणासुदीतील गर्दीत ‘स्पेशल ट्रेन’ ठरणार वरदान!

दसरा-दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या काळात घरची ओढ असतेच, पण तिकीट मिळणे ही एक मोठी डोकेदुखी ठरते. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नागपूरकऱ्यांना आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई व पुण्याहून एकूण 40 विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्यामुळे यंदाची दसरा आणि दिवाळी अधिकच सुखद ठरणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories