Ladki Bahin Yojana: सणासुदीच्या काळात अनेक महिलांना अपेक्षित आर्थिक मदत वेळेवर न मिळाल्याने नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं आहे. रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला असला, तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा हप्ता अद्यापही बँक खात्यांमध्ये जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर हप्ता न मिळाल्याने नाराजी निर्माण झाली होती. मात्र आता प्रशासनाकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ऑगस्ट व सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र करून तब्बल 3000 रुपये याच महिन्यात खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
सरकारने पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सप्टेंबरमध्येही रक्कम न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.