धुळ्यातील संपूर्ण परिवाराने संपवले आयुष्य, कारण काय? वाचा वृत्त सविस्तर

Published : Sep 20, 2024, 08:35 AM ISTUpdated : Sep 20, 2024, 08:37 AM IST
Death

सार

धुळे येथे एकाच परिवारातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांनी दिली असून मृत्यू मागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

Maharashtra News : महाराष्ट्रातील धुळ्यातील एकाच परिवारातील दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धुळ्यातील प्रमोद नगर परिसरातील सदर घटना असून सर्व मृतदेह घरात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर घटनेतील मृत व्यक्तीचे नाव प्रवीण मानसिंग गिरसे असून तो शेतीसाठी लागणारे खतं विक्री करायचा. त्याची पत्नी गीता प्रवीण गिरसे ही शिक्षिका होती. याशिवाय मितेश आणि सोहम अशी दोन मृत मुलांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण
धुळे जिल्ह्यातील देओपुर पोलीस स्थानकाच्या परिसरात सदर घटना घडली. येथील प्रमोद नगर परिसरात चारजणांचा मृतदेह आढळले. पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती देत म्हटले की, चौघांचा तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. मृतदेह कुजल्याने त्यामधून दुर्गंधी येऊ लागली होती.

सदर घटनेत, प्रमोद गिरसेने गळफास लावून घेत आत्महत्या केली असावी. तर पत्नी आणि दोन मुलांनी विष प्राशन करत जीव दिला असावा. घरातील मंडळींनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले यामागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. घरात सुख-समृद्धी असूनही गिरसे परिवारातील सर्वांच्या मृत्यूने स्थानिकांना धक्क बसला आहे. सध्या घटनेमागील कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.

नक्की काय घडले?
गिरसे परिवाराचे घर गेल्या चार दिवसांपासून बंद होते. पोलिसांनी अधिक माहिती देत म्हटले की, घरकाम करण्यासाठी येणारी बाई देखील दोनदा घर बंद असल्याचे दिसल्याने परत निघून जायची. पण चार दिवस उलटून गेल्यानंतरही गिरसे परिवारातील एकाही आवाज न आल्याने काहीजणांनी गिरसे याची बहीण संगीताला याबद्दल सांगितले. यानंतर संगीता भावाच्या घरी येत काहीजणांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी प्रवीणने स्वत:ला गळफास लावून घेण्यासह अन्य तिघेजण जमीनीवर मृताव्यस्थेत संगीताने पाहिले. घटनेची माहिती पोलिसांना दिली असता ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. चौघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा : 

EY कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा Overwork मुळे मृत्यू, केंद्राकडून अधिक तपास सुरु

नागपूरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर छोट्या बहिणी देखत बलात्कार, संशयिताचा शोध सुरू

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती