बनावट आयटी कंपनीतला सायबर चोरीचा डाव उधळला, तब्बल ६१ लॅपटॉप करण्यात आले जप्त

Published : May 24, 2025, 02:25 PM IST
canva pic

सार

पुणे शहरातील एका बनावट कॉल सेंटरमधून शेकडो लोकांना फसवण्यात आले आहे. पोलिसांनी धाड टाकून १०० ते १५० जणांवर कारवाई केली असून, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल आणि महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत. 

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर हे आयटी हब म्हणून ओळखले जात असताना, याच शहरात एका बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून तब्बल शेकडो लोकांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत १०० ते १५० जणांवर कारवाई करत ६१ लॅपटॉप्स, ४१ मोबाईल फोन्स आणि महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत.

पुण्यातील एका आयटी कंपनीसारख्या भासणाऱ्या जागेत, खोटे कॉल्स करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. परदेशी नागरिकांना बोगस कॉल्स करून त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करण्याचा हा प्रकार असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे.

पुण्याचा आयटी, एज्युकेशन आणि स्टार्टअप्ससाठीचा लौकिक असताना, अशा घटना शहराची विश्वासार्हता धुळीस मिळवताना दिसत आहेत. अनेक युवक रोजगाराच्या नावाखाली अशा संशयित ठिकाणी काम करत असल्याचंही या प्रकरणातून समोर आलं आहे.

एका बनावट कॉल सेंटरमध्ये शंभरहून अधिक कर्मचारी महिन्यांपासून काम करत होते, आणि एवढं मोठं रॅकेट पोलिसांच्या नजरेतून दूर राहतं, हेच एक चिंतेचं कारण आहे. केवळ कारवाई करून भागणार नाही, तर अशा सायबर टोळ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nagpur Smart City Case : स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंना क्लीन चिट; ईओडब्ल्यू व पोलिसांचा अहवाल विधानसभेत सादर
BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात