सकाळी उठून पाहिलं तर दोघांचा मृत्यू झाला होता, सापाने झोपेतच दंश केला आणि...

Published : May 24, 2025, 01:28 PM IST
SNAKE BITE

सार

बीड जिल्ह्यातील काजळी गावात दोन सख्ख्या भावंडांचा साप चावल्याने झोपेतच मृत्यू झाला आहे. १० आणि ८ वर्षांच्या या दोन मुलांना रात्री झोपेत असताना साप चावला. सकाळी उठेना झाल्याने पालकांनी पाहणी केली असता त्यांच्या शरीरावर विषारी दंशाचे निशाण आढळून आले.

बीड | प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील काजळी गावामध्ये घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एका कुटुंबातील दोन सख्ख्या भावंडांचा साप चावल्यामुळे झोपेतच मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना इतकी अचानक आणि धक्कादायक होती की, संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

झोपेतील चिमुकल्यांवर काळाचा घाला गावातील रहिवासी असलेल्या एका शेतकरी कुटुंबातील १० आणि ८ वर्षांच्या दोन मुलांना रात्री झोपेत असताना साप चावला. सकाळी झोपेतून उठण्याचं नाव न घेतल्याने पालकांनी पाहणी केली, तेव्हा दोघांच्याही शरीरावर विषारी दंशाचे निशाण आढळले. तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं.

या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गाव हादरून गेला आहे. संपूर्ण गाव शोकमग्न झाला असून, मृत बालकांच्या पालकांची अवस्था पाहून डोळे पाणावत होते. दोन निष्पाप जीव एका क्षणात काळाच्या भक्ष्यस्थानी पडल्याने गावात हंबरडा फुटला होता. या घटनेने गावात सर्पदंशाविषयीची भीती अधिक तीव्र केली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभाग आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ निरीक्षण आणि जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Ration Card : दीड वर्षानंतर रेशनकार्ड धारकांना बंपर लॉटरी! 'या' वस्तूचा लाभ मिळणार, लगेच तपासा!