पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेली पनवेल-अलीपूरद्वार अमृत भारत साप्ताहिक एक्स्प्रेस येत्या २३ फेब्रुवारीपासून नियमित धावणार आहे. या गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ११ जनरल डबे आहेत.
विनाआरक्षण प्रवास: जनरल डब्यांची संख्या जास्त असल्यामुळे ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट नाही, त्यांनाही कमी खर्चात आणि सुलभतेने प्रवास करता येईल.
कोणाला होणार फायदा? ही गाडी कल्याण, नाशिक रोड, जळगाव आणि भुसावळ अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.