रेशनवर गहू-तांदूळ मिळणार की मका? 'या' जिल्ह्यांत धान्याचं गणित बदललं; पुणेकरांसाठी प्रशासनाचा मोठा खुलासा!

Published : Feb 19, 2026, 05:27 PM IST

Ration grain distribution rules: राज्यात काही जिल्ह्यांत रेशनवर तांदळाऐवजी मका वाटपाचा निर्णय झाल्याने संभ्रम निर्माण झाला. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी पुणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पुणेकरांना गहू, तांदूळ मिळतील.

PREV
15
रेशनवर गहू-तांदूळ मिळणार की मका? 'या' जिल्ह्यांत धान्याचं गणित बदललं

पुणे : रेशन दुकानांत आता तांदळाऐवजी मका मिळणार का? या एका प्रश्नाने सध्या राज्यातील रेशन कार्डधारकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केला आहे. काही जिल्ह्यांत मक्याचे उत्पादन वाढल्याने शासनाने रेशनमध्ये मका देण्याचा निर्णय घेतला असला, तरी पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

25
पुणे जिल्ह्यात काय मिळणार?

पुणे जिल्ह्यात रेशनवर तांदूळ बंद होऊन मका मिळणार, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने आता चित्र स्पष्ट केले आहे. पुणे जिल्ह्यात सध्या तरी मका वितरणाचे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पुण्यातील लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच गहू आणि तांदूळ मिळत राहणार आहेत. 

35
राज्यात 'मका' वाटपाचा निर्णय का?

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा मक्याचे बंपर उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि साठवणुकीची अडचण येऊ नये, म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) मक्याचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या जिल्ह्यांत मक्याची उपलब्धता जास्त आहे, तिथेच तांदळाऐवजी मका दिला जात आहे. 

45
लाभार्थ्यांची चिंता, "आमचा तांदूळ बंद करू नका"

मका वाटप सुरू झालेल्या जिल्ह्यांतून काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांच्या मते

घरात आधीच मका: अनेक शेतकरी कुटुंबांकडे स्वतःच्या शेतातला मका उपलब्ध आहे, त्यात रेशनवरही मका मिळाल्यास त्याचा वापर कसा करावा, असा प्रश्न आहे.

खाद्यसंस्कृती: तांदूळ हा रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असल्याने तांदळाच्या जागी मका स्वीकारणे अनेकांसाठी कठीण जात आहे. 

55
सध्याची धान्य वितरण व्यवस्था कशी आहे?

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या खालीलप्रमाणे धान्य वाटप सुरू आहे.

योजना गव्हाचे प्रमाण तांदळाचे प्रमाण एकूण धान्य

प्राधान्य कुटुंब (PHH) ३ किलो (प्रति व्यक्ती) २ किलो (प्रति व्यक्ती) ५ किलो

अंत्योदय योजना (AAY) २१ किलो (प्रति कार्ड) १४ किलो (प्रति कार्ड) ३५ किलो

पुणे जिल्ह्यासाठी हीच व्यवस्था कायम राहणार असून कार्डधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories