भोगवटादार वर्ग-2 मध्ये एकूण 16 प्रकारच्या जमिनी मोडतात. त्यामध्ये प्रामुख्याने
मुंबई कुळ कायदा, 1948 अंतर्गत विक्री झालेल्या जमिनी
विविध इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळून)
शासनाच्या योजनांमधून भूमिहीन शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनी
गृह निर्माण संस्था व औद्योगिक वापरासाठी दिलेल्या जमिनी
सिलिंग कायद्यानुसार जास्तीच्या जमिनींचे पुनर्वाटप
महानगरपालिका व ग्रामपंचायतींसाठी राखीव ठेवलेल्या जमिनी
याशिवाय देवस्थान इनाम जमिनी, आदिवासी खातेदारांच्या जमिनी, पुनर्वसन योजनांतील जमिनी, शासकीय भाडेपट्टीवरील जमिनी, भूदान-ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी, खाजगी वन संपादन कायद्यातील प्रलंबित जमिनी, भूमीधारी हक्कांतर्गत मिळालेल्या जमिनी, सिलिंग कायद्यानुसार सूट दिलेल्या जमिनी, भूसंपादन कायद्यानुसार संपादित जमिनी तसेच वक्फ जमिनींचाही या वर्गात समावेश होतो.