Beed Railway: तब्बल ४० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवेचे उद्घाटन झाले आहे. सध्या डिझेलवर धावणारी ही सेवा लवकरच विद्युतीकरणामुळे वेगवान होणार असून, यामुळे बीड जिल्हा रेल्वे नकाशावर आला आहे.
बीड: 17 सप्टेंबर 2025 बीडकरांसाठी इतिहासातील एक सोनेरी दिवस! तब्बल 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवा सुरु झाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने या बहुप्रतिक्षित रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले असून, बीडवासीयांचे दीर्घकाळाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे.
28
रेल्वे प्रवासाची सुरुवात डिझेलवर, लवकरच विद्युतीकरण
सध्या ही रेल्वे डिझेल इंजिनावर चालवण्यात येत असून, विद्युत पुरवठ्यासाठी 232 KVA क्षमतेची दोन उपकेंद्रे उभारली जात आहेत. ही कामं अंतिम टप्प्यात असून, विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा वेग अधिक वाढणार आहे, व प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.
38
वेळापत्रक, आठवड्यात 6 दिवस सेवा
अहिल्यानगरहून सुटण्याची वेळ: सकाळी 6.55 वाजता
बीडला आगमन: दुपारी 12.30 वाजता
बीडहून परतीची वेळ: दुपारी 1.00 वाजता
अहिल्यानगरला पोहोचण्याची वेळ: सायंकाळी 6.30 वाजता
रविवार सुट्टीचा दिवस असून उर्वरित 6 दिवस सेवा सुरू राहील.
यामुळे अनेक ग्रामीण भागांनाही थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे.
58
तिकीट दर, सर्वसामान्यांसाठी दिलासादायक
अहिल्यानगर ते बीड प्रवासाचा तिकीट दर केवळ ₹45 असून, हा प्रवास अत्यंत परवडणारा आहे. मात्र, बीड रेल्वेस्थानक शहरापासून काहीसा दूर असल्यामुळे रिक्षा किंवा अन्य वाहतूक खर्च वेगळा पडू शकतो.
68
रेल्वे प्रकल्पाचा प्रवास, 40 वर्षांचा संघर्ष
या प्रकल्पाची मागणी 1980 च्या दशकात सुरु झाली होती.
1995 मध्ये तांत्रिक मान्यता मिळाली होती.
तेव्हा प्रकल्पाचा खर्च ₹355 कोटी, आज तो वाढून ₹4800 कोटींवर गेला आहे.
राज्य व केंद्र सरकारने 50-50 खर्च उचलण्याचे धोरण ठेवले आहे. राज्य सरकारकडून ₹2241 कोटींचा निधी दिला गेला आहे.
ही रेल्वे सेवा अहिल्यानगर – बीड – परळी या एकूण 261 किमी मार्गाचा एक भाग आहे. यातील पहिला टप्पा – अहिल्यानगर ते बीड (166 किमी) पूर्ण झाला असून, बीड ते परळी टप्प्यातील काही कामं अद्याप सुरु आहेत.
78
राजकीय इच्छाशक्ती आणि सहकार्य
हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाला. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने हा मराठवाड्यातील पहिला सहकारी रेल्वे प्रकल्प ठरला.
88
अहिल्यानगर–बीड रेल्वे, मराठवाड्याच्या प्रगतीचा नवा अध्याय
अहिल्यानगर–बीड रेल्वे केवळ एक प्रवास सुविधा नाही, तर मराठवाड्याच्या प्रगतीचा नवा अध्याय आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा देत, या सेवेने बीडचे रेल्वे नकाशावर स्थान निश्चित केले आहे.