Bank Holidays : नोव्हेंबरमध्ये बँका 9 ते 10 दिवस राहणार बंद; महाराष्ट्रात कधी सुट्टी? वाचा संपूर्ण हॉलिडे वेळापत्रक

Published : Oct 27, 2025, 11:58 AM IST
Bank holidays

सार

Bank Holidays : नोव्हेंबर 2025 मध्ये देशभरातील बँका 9 ते 10 दिवस बंद राहतील, तर महाराष्ट्रात फक्त एकदिवस सुट्टी असेल. मात्र, ऑनलाइन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे बँकेची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा. 

Bank Holidays : सणासुदीचा हंगाम संपताच नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. अनेकजण आता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. मात्र, नोव्हेंबरमध्ये बँकेत कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या महिन्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये बँका **सुमारे 9 ते 10 दिवस बंद राहतील.** त्यामुळे बँकेशी संबंधित व्यवहार नियोजनपूर्वक करा.

आरबीआयची अधिकृत यादी 

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी आणि दर महिन्याला बँक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करते. या यादीत राष्ट्रीय, धार्मिक, प्रादेशिक तसेच दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असतो. त्यामुळे शाखेत जाण्यापूर्वी यादी तपासणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होऊ नये.

 नोव्हेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी

  • 1 नोव्हेंबर: कुट (मणिपूर), पुद्दुचेरी लिब्रेशन डे (पुद्दुचेरी), हरियाणा डे (हरियाणा), कन्नड राज्योत्सव (कर्नाटक)
  • 5 नोव्हेंबर: गुरु नानक जयंती (महाराष्ट्र), कार्तिक पूर्णिमा (ओडिशा व तेलंगणा)
  • 7 नोव्हेंबर: वांगाला फेस्टिव्हल (मेघालय)
  • 8 नोव्हेंबर:कनकदास जयंती (कर्नाटक)
  • 1 नोव्हेंबर: ल्हाबाब दुचेन (सिक्कीम)
  • 23 नोव्हेंबर: सेंग कुट स्नेम (मेघालय)
  • 25 नोव्हेंबर: गुरु तेग बहादूर शहीद दिन

 महाराष्ट्रात फक्त एकच सुट्टी

नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात केवळ एकच सुट्टी ५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त राहणार आहे. ऑक्टोबरमध्ये अनेक बँक सुट्ट्या असल्याने काही कामे राहिली असतील, तर ती या महिन्यात उरकून घ्यावीत.

ऑनलाइन व्यवहार सुरू राहणार

बँकांच्या सुट्ट्यांदरम्यानदेखील UPI, NEFT, RTGS आणि ATM सेवा सुरू राहतील. त्यामुळे ग्राहकांना रोख रक्कम काढणे, ट्रान्सफर करणे किंवा बिल भरणे यासाठी अडचण येणार नाही.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!
कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो