भोंदूबाबा अशोक खरातची ‘पंचसूत्री’ उघड; विश्वास जिंकून महिलांना जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

Published : Mar 26, 2026, 09:38 AM IST
Ashok Kharat Case

सार

Ashok Kharat Case : अशोक खरात याने लोकांना फसवण्यासाठी ‘पंचसूत्री’ पद्धत वापरल्याचा आरोप समोर आला आहे. जन्मतारीख, सहानुभूती, संबंध जुळवणे आणि भूखंड व्यवहार अशा मार्गांनी तो लोकांना जाळ्यात ओढत होता.

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूगिरी प्रकरणात अटकेत असलेला अशोक खरात याच्या कुकर्मांचे धक्कादायक तपशील एकामागोमाग समोर येत आहेत. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणाऱ्या खरातने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक आणि महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी ठरावीक ‘पंचसूत्री’ कार्यपद्धती वापरल्याचे उघड झाले आहे. या पद्धतीच्या जोरावर तो अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे.

अचूक जन्मवार सांगण्याचे नाटक

अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या व्यक्तीची जन्मतारीख विचारून अचूक जन्मवार सांगत असल्याचा दावा करायचा. या कौशल्याच्या आधारे तो स्वतःला अत्यंत बुद्धिमान आणि दैवी शक्ती असलेला असल्याचे भासवायचा. यामुळे लोकांचा त्याच्यावर सहज विश्वास बसत असे.

महिलांची सहानुभूती मिळवून जाळ्यात ओढणे

खरात जोडप्यांना समोर बसवून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करायचा. पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण करून तो महिलांची सहानुभूती मिळवायचा. काही प्रकरणांमध्ये पतीवर दोष ठेवून नात्यात दुरावा निर्माण केला जात असे. या परिस्थितीचा फायदा घेत तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे.

मुलींच्या माध्यमातून अधिकारी-उद्योगपतींना टार्गेट

अशोक खरात हा काही मुलींच्या माध्यमातून मोठे अधिकारी आणि उद्योगपती यांच्याशी संबंध जुळवून देत असे. अंकशास्त्राच्या नावाखाली तो हे संबंध प्रस्थापित करत असे. नंतर त्याच मुलींमार्फत संबंधित व्यक्तींविरोधात तक्रारी करून त्यांचे व्हिडीओ तयार केले जात असल्याचेही समोर आले आहे.

भोंदूगिरीच्या आडून जमीन व्यवहार

खरात लोकांना त्यांच्या ‘भाग्य’साठी घर किंवा जागा बदलण्याचा सल्ला देत असे. अंकशास्त्राचा आधार घेत तो विशिष्ट भूखंड सुचवत असे आणि तीच जागा खरेदी करण्यास भाग पाडत असे. अनेकदा ही जमीन त्याच्याच मालकीची असल्याचा संशय आहे. अशा प्रकारे तो आर्थिक फसवणूकही करत असल्याचे आरोप आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'