ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मराठा इतिहास क्षेत्रात शोककळा

Published : Mar 26, 2026, 08:01 AM IST
dr jaysingrao pawar

सार

Dr. Jaysingrao Pawar Passes Away : ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांचे 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 25 पेक्षा अधिक ग्रंथ, 45 संशोधन निबंध लिहून मराठा इतिहास संशोधनात मोलाचे योगदान दिले.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away : महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधकडॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रावर शोककळा पसरली असून “मराठेशाहीचा इतिहासकार हरपला” अशी भावना व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक प्रवास आणि संशोधनाची सुरुवात

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. त्यांनी शिवाजी विद्यापीठ येथून एम.ए. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 1964 पासून त्यांच्या संशोधन कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांना अध्यापन करत प्राध्यापक म्हणून काम केले.

इतिहास साहित्याची समृद्ध परंपरा

डॉ. पवार यांनी महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे, मराठेशाहीचा इतिहास आणि राजश्री शाहू महाराज यांच्यावर आधारित 25 पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले. तसेच एम.ए. विद्यार्थ्यांसाठी 20 क्रमिक पुस्तकेही तयार केली. विविध इतिहास परिषदांमध्ये त्यांचे 45 हून अधिक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले आहेत.

संस्था स्थापना आणि व्यापक कार्य

1992 मध्ये त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची स्थापना केली आणि संस्थापक-संचालक म्हणून कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1200 पानांचा तीन खंडांचा ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ प्रकाशित झाला. या ग्रंथाचे भारतातील 16 भाषांसह अनेक परकीय भाषांमध्ये अनुवाद सुरू आहे. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षपदही भूषविले.

पुरस्कार आणि गौरव

इतिहास संशोधन क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांच्या ग्रंथांचे प्रकाशन झाले होते. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून पुरस्कार मिळाले.

मराठा इतिहासाला दिलेले अमूल्य योगदान

डॉ. पवार हे विशेषतः राजश्री शाहू महाराज यांचे चरित्रकार म्हणून ओळखले जात होते. मराठा इतिहासाचा सखोल अभ्यास, संशोधन आणि समाजप्रबोधन यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या निधनाने इतिहास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'