Ashok Kharat Case : अशोक खरातचा काळा चेहरा उघड; व्हिडिओ पुराव्यांमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

Published : Mar 23, 2026, 10:06 AM IST
astrologer Video out Ashok Kharat arrest

सार

Ashok Kharat Case : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात पोलिसांना 100 व्हिडिओ क्लिप्स सापडल्या असून, या प्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कथित ‘सॉफ्ट कॉर्नर’मुळे कारवाई उशिरा झाल्याची चर्चा रंगली आहे.

Ashok Kharat Case : नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित तंत्र-मंत्र करणारा अशोक खरात सध्या स्वतःच मोठ्या अडचणीत सापडला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याचे धक्कादायक कारनामे एकामागोमाग एक समोर येत आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या सुमारे 100 व्हिडिओ क्लिप्समुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

‘पॉवरफुल’ व्यक्तीमुळे कारवाई लांबली?

या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वीच अशोक खरात याच्यावर कारवाई होऊ शकली असती, मात्र एका प्रभावशाली व्यक्तीने त्याला संरक्षण दिल्याने अटक टळल्याची चर्चा आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेवर संशय

नाशिकमधील एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याचे नाव या प्रकरणात चर्चेत आले आहे. संबंधित अधिकारी खरातचा ‘भक्त’ असल्याची चर्चा असून, त्याने खरातच्या कुटुंबीयांच्या कार्यक्रमातही सहभाग घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारदारांवरच कारवाईचा सल्ला?

मिळालेल्या माहितीनुसार, खरातने काही व्हिडिओ क्लिप्स या अधिकाऱ्याला दाखवल्या होत्या. मात्र, तत्काळ कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांवरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे.

तंत्रज्ञानातून उघड झाला प्रकार

या क्लिप्स पुन्हा पाहण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची गरज होती. खरातने मोबाईल पोलिसांकडे दिल्यानंतर तांत्रिक मदतीने या क्लिप्स उघडण्यात आल्या. त्यातील धक्कादायक दृश्ये पाहून पोलीसही हादरल्याची माहिती आहे. अखेर सर्व पुरावे संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले.

कारवाई न झाल्याने वाढले संशय

क्लिप्समधील गंभीर बाबी समोर आल्यानंतरही तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, अशी चर्चा आहे. उलट हे प्रकरण बाहेर गेल्यास बदनामी होईल, असा इशारा देत ते दडपण्याचा प्रयत्न झाला असल्याचे बोलले जात आहे. जर वेळेत कारवाई झाली असती, तर हे प्रकरण आधीच उघडकीस आले असते, असेही मत व्यक्त होत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

नोकरीची सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती; अर्ज करण्याची मुदत वाढली, पाहा पात्रता आणि तपशील
Maharashtra Weather Update: राज्यात निसर्गाचा 'डबल अटॅक'! १० जिल्ह्यांना यलो अलर्ट; कुठे उन्हाचा चटका, तर कुठे गारपिटीचं संकट?