Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात SIT च्या तपासाला वेग, आणखी एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी

Published : Mar 21, 2026, 10:52 AM IST
Ashok Kharat Case

सार

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात SIT तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली असून त्याच्या राजकीय आणि व्यावसायिक संबंधांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे राजकारणातही मोठी खळबळ उडाली असून रूपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

Ashok Kharat Case : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तपास यंत्रणांनी चौकशीची व्याप्ती वाढवली आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ, चाकणकरांचा राजीनामा

या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. विरोधकांच्या वाढत्या दबावानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर पद सोडले.

निकटवर्तीय दीपक लोंढे यांची SIT कडून चौकशी

तपासात नव्या घडामोडी समोर येत असून दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची SIT कडून कसून चौकशी करण्यात आली आहे. लोंढे आणि अशोक खरात यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः सिन्नर परिसरातील जमीन व्यवहारांमध्ये लोंढे सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे.

राजकीय आणि व्यावसायिक संबंधांचा शोध

SIT पथकाने दीपक लोंढे यांच्याकडून विविध आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली आहे. या तपासातून मिळणाऱ्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिस आता खरातच्या संभाव्य राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारच्या निर्णयावरून प्रश्नचिन्ह

या प्रकरणाशी संबंधित आणखी एक बाब समोर आली आहे. मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानासाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्याचा निर्णय 31 जुलै 2020 रोजी घेण्यात आला होता. हा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता. त्यामुळे खरातचा राजकीय प्रभाव किती होता, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात याच्याविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपानुसार, त्याने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. 18 मार्च रोजी पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले.

कोण आहे अशोक खरात?

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीतून निवृत्त अधिकारी आहे. तो अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट म्हणून ओळखला जात होता. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'