
नागपूर | प्रतिनिधी नागपूर शहरातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मागील पाच महिन्यांत पोलिसांनी २ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त करत २९२ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज साखळीला मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये केवळ किरकोळ विक्रेते नव्हे तर रेव्ह पार्टी आयोजक, तस्कर, आणि अनेक पुरवठादारांचा समावेश आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार (NDPS Act) हे सर्व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन पोलिसांना माहिती पुरवावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केलं आहे. शहरातील तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नये, यासाठी ही मोहीम अधिक व्यापकपणे राबवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.