सून हत्याप्रकरणात अजित पवार गटाच्या नेत्याची हकालपट्टी, गुन्ह्यात ठरला दोषी

Published : May 23, 2025, 04:38 PM IST
rajendra hagwane

सार

पुण्यातील बावधनमध्ये २४ वर्षीय वैष्णवी हगवणेचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणात हुंड्यासाठी हत्या झाल्याचा संशय आहे. पतीसह सासू, नणंदेला अटक, सासरे आणि दीर फरार.

पुण्यातील बावधन परिसरात १६ मे रोजी २४ वर्षीय वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला आत्महत्या असलेल्या या प्रकरणात, पोसमार्टम अहवालात शरीरावर जखमांचे निशाण आढळल्याने हत्या की आत्महत्या याबाबत संशय वाढला आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीने ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि ₹२ कोटींच्या जमिनीची मागणी केली होती. या मागण्यांमुळे वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली आहे, तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हे फरार होते.

राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने राजेंद्र हगवणे यांना पक्षातून हकालपट्टी केली असून, या प्रकरणात कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वैष्णवीच्या १० महिन्यांच्या मुलाला तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असून, महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!