Vaishnavi Hagawane Case : "आरोपींवर मकोका लागू करा" वैष्णवीच्या आई-वडिलांची मागणी

Published : May 23, 2025, 12:54 PM IST
Vaishnavi Hagawane Case

सार

वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. अशातच फरार सासरे आणि दिराला अखेर अटक करण्यात आली आहे. यावरच आता वैष्णवीच्या पालकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vaishnavi Hagawane Case : पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अखेर सात दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना स्वारगेट परिसरातून पहाटे साडेपाचच्या सुमारास अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती, तसेच राजकीय पातळीवरही मोठी खळबळ माजली होती. या अटकेनंतर आता वैष्णवीच्या आई-वडिलांनी आपली प्रतिक्रिया दिली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे म्हणाले की, "राजेंद्र आणि सुशील हगवणेंना अटक झाली, ही योग्य कारवाई आहे. पण एवढ्यावर समाधान नाही. आमच्या मुलीवर अमानुष छळ केला गेला. तिच्यावर मारहाण झाली, मानसिक त्रास दिला गेला. त्यामुळे या सगळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. केवळ अटक करून काही उपयोग नाही, सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे. जेव्हा मकोका लावला जाईल तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची जाणीव होईल."

वैष्णवीच्या आईनेही भावना व्यक्त करत म्हटलं, "राजेंद्र आणि सुशील हगवणेंना अटक झाली, याबद्दल मी सरकारचे, अजित पवारांचे आणि माध्यमांचे आभार मानते. पण आमची हीच मागणी आहे की आता मकोका अंतर्गत आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. वैष्णवीवर तिच्या सासूने, नणंदेने आणि पतीने खूप छळ केला होता."

नेमकं प्रकरण काय आहे? 
23 वर्षांची वैष्णवी शशांक हगवणे हिने 16 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं. वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली गेली होती. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्यांनी तिला त्रास देणं सुरू केलं. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला, किरकोळ कारणांवरून भांडणं झाली, शारीरिक मारहाण झाली. पती शशांक, सासू लता, सासरे राजेंद्र, नणंद करिश्मा आणि दीर सुशील या सर्वांनी मिळून हुंड्यासाठी तिला छळ केला. पोस्टमार्टम अहवालातही तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसून आले. याप्रकरणात शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांना आधीच अटक करण्यात आली होती. आता राजेंद्र आणि सुशील हगवणे अटकेत असून, या प्रकरणात कायदेशीर कारवाईला वेग आला आहे.वैष्णवीच्या पालकांनी याप्रकरणी मकोका अंतर्गत कठोर कारवाईची मागणी करत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!