शिर्डीकडे जाणाऱ्या विमानात एअर होस्टेसची काढली छेड, विमानतळावरून आरोपीला अटक

Published : May 05, 2025, 08:17 AM IST
nancy tiwari

सार

दिल्लीहून शिर्डीकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसची छेड काढण्याचा प्रयत्न केला. विमान शिर्डीत उतरल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

शिर्डी | प्रतिनिधी दिल्लीहून शिर्डीकडे येणाऱ्या इंडिगोच्या प्रवासी विमानात शुक्रवारी दुपारी घडलेली एक अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशाने फ्लाइटमधील एअर होस्टेसशी टॉयलेटजवळ अश्लील वर्तन करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे विमानातील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक माहितीनुसार, शिर्डी विमानतळावर विमान उतरू लागले असताना सदर प्रवाशाने टॉयलेटच्या जवळ एअर होस्टेसला अयोग्यरीत्या स्पर्श केला. हे वर्तन असह्य ठरल्याने संबंधित एअर होस्टेसने तत्काळ ही बाब क्रू मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिली. विमान उतरताच सुरक्षारक्षकांना याची माहिती देण्यात आली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीला ताब्यात घेतले.

पुढील कारवाईसाठी आरोपीला शिर्डी जवळील रहाटा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला असून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याने खरोखरच मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेने पुन्हा एकदा हवाई सेवांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. संबंधित एअरलाईन कंपनीनेही घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीविरोधात कठोर कारवाई होईल, असे सांगण्यात आले आहे.

PREV

Recommended Stories

भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Ration Card : दीड वर्षानंतर रेशनकार्ड धारकांना बंपर लॉटरी! 'या' वस्तूचा लाभ मिळणार, लगेच तपासा!