
Pimpari Chinchwad Crime News: सध्याच्या काळात विवाहबाह्य संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. लग्नानंतर अनेक विवाहित जोडप्यांचे बाहेर संबंध वाढत असताना दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड येथे या प्रकारची घटना घडल्याचं दिसून आलं आहे. देहू रोड परिसरामध्ये पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचा खून केला. त्यानं विवाहबाह्य संबंध सुरु असताना या दोघांना पकडलं आणि त्यानंतर दोघांचा खून केला.
खून केलेल्या पतीला पोलिसांनी अटक केली. तो लेबर कॉन्ट्रॅक्टर असून त्याच नाव ज्ञानेश्वर साबळे आहे. पतीने खून करताना विटेचा ब्लॅक वापरला आणि दोघांचा निर्घृण खून केला. पत्नीचा प्रियकर हा तिच्या नवऱ्याच्या येथे लेबर म्हणून काम करायचा, त्या दोघांचं प्रेम हे कामावर येत असतानाच फुललं होत. या दोघांमध्ये झालेल्या प्रेमाची कल्पना नवऱ्याला आली होती आणि तो दोघांवर लक्ष ठेवून होता. त्यानं दोघांना मध्यरात्री एकत्र पहिला आणि दोघांचा काटा काढायचा ठरवलं.
ज्ञानेश्वरने दोघांचा खून करण्याचं ठरवलं आणि त्या दोघांना संबंध करताना पकडलं. त्यानं दोघांना पकडून त्यांच्या डोक्यात दगड घातला आणि सूडाचा बदला घेतला. देहूरोड पोलिसांनी ज्ञानेश्वर साबळे याला पकडून बेड्या घातल्या. यामधून आता आणखी कोणती माहिती समोर येते ते लवकरच लक्षात येईल.
विवाहबाह्य संबंध सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. त्यामुळे समाजातील एका वेगळ्याच रूपाचं आपल्या सर्वांना दर्शन घडत आहे. लग्नानंतर पती किंवा पत्नी या दोघांचे संबंध बाहेर असल्यामुळे त्यांचं घरात व्यवस्थित लक्ष लागत नाही. मुलांवर, सासू सासऱ्यांवर लक्ष न दिल्यामुळे कुटुंबव्यवस्था बिघडत चालली आहे.