सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Published : Jun 25, 2025, 11:45 AM ISTUpdated : Jun 25, 2025, 01:21 PM IST
accident solapur

सार

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर डंपर आणि दुचाकीची भीषण धडक झाल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मोठ्या वाहनांच्या वेगमर्यादेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

सोलापूर- २४ जून २०२५ रोजी सुमारे सकाळी साडेअकराच्या सुमारास, सोलापूर–हैदराबाद महामार्गावर एका ठिकाणी वेगाने येणारा डंपर समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवर तीन तरुण प्रवास करत होते—देविदास दुपारगुडे (४०), नितीन वाघमारे (३५), आणि हनुमंत राठोड (४०). दुर्दैवाने या तीनही व्यक्तींचा त्या ठिकाणीच मृत्यू झाला

लोकांनी केली गर्दी 

धडक झाल्यानंतर ताबडतोब पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तीन मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अपघाताबद्दल माहिती मिळताच गावात गर्दी झाली होती आणि रुग्णालयात लोक उपस्थित होते.

सुरक्षिततेवर प्रशचिन्ह 

उपस्थित या घटनेमुळे मुख्य म्हणजे मोठ्या वाहनांची वेगाची मर्यादा का ठेवली जात नाही, यावर प्रश्न उपस्थित होतो. तसेच महामार्गावर वेगाचे नियंत्रण नसल्यामुळे किंवा जागेची नीट व्यवस्था नसल्यामुळेच हे प्रकार वारंवार घडत आहेत. लोकांचे जीव घेऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई होणे गरजेचे दिसते.

अशा चालकांवर कठोर कारवाई होणं आवश्यक 

पोलिसांनी केस नोंदवून तपास सुरू केला असून अपघात करणाऱ्या डंपर चालकावर योग्य कारवाई केली जाईल. पुढील उपाय म्हणून, दुर्घटनास्थळी स्पीड ब्रेकर, चेतावणी बोर्ड, आणि रस्त्यावरील कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहेत. समाजानेही अधिक जागरूकता वाढवून, रस्त्यांवर सुरक्षित वाहनचालनाची माहिती देणं आवश्यक असत.

आधी घडलेल्या घटना जाणून घ्या 

२०२३ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरजवळ एक डंपर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली होती, ज्यामध्ये दोन तरुण जागीच ठार झाले. डंपरचा वेग जास्त होता आणि तो रस्त्याच्या चुकीच्या लेनवरून येत होता या अपघातामध्ये त्याचीच चुकी होती. त्यामुळे डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाली.

२०२२ मध्ये बीड–अहिल्यानगर रस्त्यावर अशाच प्रकारे एका ट्रकने स्कुटीला धडक दिली होती, ज्यामध्ये पती-पत्नी जागीच मृत्यूमुखी पडले. दोघंही नोकरीसाठी जात होते. या प्रकरणात ट्रकचालक नशेत असल्याचं उघड झालं होतं. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या देऊन वाहतूक रोखली होती.

पुणे जिल्ह्यातही लोणीकंद भागात २०२१ मध्ये वेगात असलेल्या कंटेनरने कॉलेजला जाणाऱ्या दुचाकीस्वारांना धडक दिली होती. त्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. नंतर पोलिस तपासात असं आढळून आलं की त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि सूचना फलक नव्हते. परिणामी अशा ठिकाणी अपघात घडतात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!