लक्ष्मण हाके यांचे आंदोलन हे स्वतःच्या फायद्यासाठी, सहकाऱ्याने केले गंभीर आरोप

Published : Jun 01, 2025, 03:36 PM IST
laxman hake

सार

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्यावर राजकीय स्वार्थासाठी आंदोलने करण्याचा आरोप केला आहे. यामुळे ओबीसी समाजात नेतृत्वाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, राजकीय पक्षही सावध भूमिका घेत आहेत.

पुणे | प्रतिनिधी राजकारणात विरोधकांनी आरोप करणे ही सामान्य गोष्ट असली, तरी स्वत:च्या जवळच्या व्यक्तीकडून आरोप होणं म्हणजे नेतृत्वाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर त्यांचे निकटवर्तीय आणि माजी सहकारी हनुमंत धायगुडे यांनी थेट आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

हाके यांच्या आंदोलनांमागे निखालस राजकीय स्वार्थ’ 

धायगुडे यांचा दावा धायगुडे यांनी केलेल्या आरोपांनुसार, लक्ष्मण हाके यांचे आंदोलन हे ओबीसी समाजासाठी नसून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आहे. त्यांनी समाजाचा वापर करून स्वतःची प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर ठपका त्यांनी ठेवला आहे. यामुळे हाके यांच्या निष्ठेवर आणि उद्दिष्टांवरच अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. ओबीसी समाजात अंतर्गत संघर्षाचे स्पष्ट संकेत? या आरोपांमुळे केवळ एका नेत्याच्या प्रतिमेला धक्का बसला नाही, तर ओबीसी समाजात नेतृत्वाच्या दिशेनेच अनिश्चितता निर्माण झाली आहे. एका बाजूला आरक्षणासाठी झगडणारा समाज, आणि दुसरीकडे नेतृत्वातच फुट पडल्यास, हा लढा कुठे नेईल? हे आता सांगता येणार नाही.

राजकीय पक्षांसाठी संधी की सावधगिरी? 

हाके हे विविध सामाजिक आंदोलनांमुळे चर्चेत आलेलं नाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांना राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र आता त्यांच्या निकटवर्तीयाकडूनच आलेल्या आरोपांमुळे, काही राजकीय पक्षांनी सावधगिरीची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. या आरोपांची सखोल चौकशी झाल्यास अनेक अनुत्तरित बाबी बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा