
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी अखेर मुख्य आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. पण तो पोलिसांच्या हातात लागला, यामागे एक धक्कादायक ट्विस्ट आहे. तो म्हणजे त्याची घटस्फोटित मैत्रीण! "चल, फिरायला जाऊ" अशी साधी मागणी, आणि त्यातूनच उलगडलं एक मोठं गुन्हेगारी रहस्य!
निलेशने २१ मे रोजी पुण्यातून फरार होताना आपल्या घटस्फोटित मैत्रिणीला फोन केला आणि तिला दिल्लीपर्यंत फिरायला चल असं म्हणत घेऊन गेला. प्रवासादरम्यान त्याने तिच्या मोबाईलवरून एका मित्राला कॉल केला. विशेष म्हणजे, तो मित्र आधीच पोलिसांच्या रडारवर होता! हेच ठरलं पोलिसांसाठी महत्त्वाचं 'कनेक्शन'. पोलिसांनी त्वरित त्या खासगी बस कंपनीची माहिती घेतली, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आणि चौकशी दिल्लीमार्गे थेट नेपाळ सीमेवर पोहोचली.
निलेशची ही मैत्रीण गुन्ह्यात थेट सहभागी नसली, तरी तिच्यासोबतच्या प्रवासामुळे आणि मोबाईल वापरामुळेच पोलिसांना तपासाचा धागा मिळाला. तिच्या मोबाईलवरून केलेला एक कॉल ठरला निर्णायक!
शिवाजीनगर कोर्टात हजर करून निलेशला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलिसांसमोर मुख्य आव्हान म्हणजे त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करणं.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेशवर संशय होता.
तो २१ मे रोजी फरार झाला.
घटस्फोटित मैत्रिणीसोबत दिल्लीपर्यंत प्रवास केला.
तिच्या मोबाईलवरून केलेल्या फोन कॉलमुळे शोध लागला.
पोलिसांनी सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे नेपाळ सीमेवरून अटक केली.
एक चुकीचा कॉल, एक संशयित संबंध, आणि पोलिसांची स्मार्ट हालचाल या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन वैष्णवी हगवणे प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला. पुढील तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.