मुंबईत २५ वर्षीय मॉडेलचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

मुंबईतील वांद्रे परिसरात एका 25 वर्षीय मॉडेलचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. वांद्रे परिसरात एका 25 वर्षीय मॉडेलचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका टँकरने दुचाकीस्वाराला धडक दिली. शिवानी सिंह असे मृत मॉडेलचे नाव असून ती मुंबईतील मालाड येथे राहत होती.

घटनेनंतर टँकरचालक गेला पळून

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टँकरची थेट मोटरसायकलला धडक बसली. घटनेनंतर टँकरचालक तात्काळ पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

टँकरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

शिवानी सिंग आणि तिचा मित्र शुक्रवारी ​​रात्री आठ वाजता दुचाकीवरून वांद्रे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून जात होते. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांना समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की शिवानी सिंह दुचाकीवरून उडून टँकरच्या चाकाखाली आली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या भाभा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले. तिचा मित्र या अपघातात जखमी झाला आहे.

आणखी वाचा-

मुंबईत महिलेची 'डिजिटल अरेस्ट', १.७ लाखांची झाली फसवणूक

Share this article