धक्कादायक ! 45 व्या मजल्यावरून उडी मारत 17 वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य

Published : May 29, 2025, 12:12 PM ISTUpdated : May 29, 2025, 12:13 PM IST
Indore Labour Death

सार

17 वर्षीय मुलीने इमारतीच्या 45 व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथे घडली आहे. ही मुलगी गेल्या काही वर्षांपासून नैराश्यात असल्याची माहिती समोर आली आहे. 

Mumbai : मुंबईतील गोरेगाव परिसरात मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली. अवघ्या १७ वर्षांच्या एका तरुणीने ४५ व्या मजल्यावरून उडी घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून आरे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

डिप्रेशनशी लढा आणि सुसाइड नोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत होती. तिच्या बॅगेतून पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली आहे. या चिठ्ठीत तिने नमूद केलं आहे की, "मी स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतला असून, कोणालाही जबाबदार धरू नये." तिच्या कुटुंबाच्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून ती डिप्रेशनशी झुंजत होती आणि तिच्यावर सतत उपचारही सुरू होते.

वडिलांचा जबाब आणि धक्कादायक खुलासा

तरुणीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, याआधीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांनी हेही उघड केलं की, एका सत्रात तरुणीने मनोविकारतज्ज्ञाला विचारलं होतं – "एक ना एक दिवस सगळ्यांनाच मरायचं आहे, तर आपण का जगतोय?" हा प्रश्न ऐकून उपस्थित सर्वजण हादरले होते. पोलिसांनी या जबाबांच्या आधारे कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आत्महत्येच्या घटना वाढत्या – सोमवारी विक्रोळीतही अशीच घटना

दरम्यान, अशाच स्वरूपाची आणखी एक धक्कादायक घटना सोमवारी विक्रोळीच्या कम्मनवार नगर परिसरात घडली होती. तिथेही एका तरुणीने २२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, तिची मानसिक स्थितीही काही काळापासून ठीक नव्हती. आयुष्यात आलेल्या बदलांमुळे आणि मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले.या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Satbara Utara : सातबारा उताऱ्यात या नोंदी दिसल्या तर सावध! जमीन जप्तीपासून कारवाईपर्यंत मोठे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जमीन वापर नियमांत ऐतिहासिक बदल! ‘सनद’ची अनिवार्यता रद्द; नागरिक–बिल्डर्स–जमीनधारकांना मोठा दिलासा