वय आणि उंचीनुसार किती असावे वजन? असा जाणून घ्या BMI

Weight and BMI : वजन वाढण्याच्या समस्येने अनेकजण सध्या त्रस्त आहेत. पण लठ्ठपणा अथवा अत्याधिक वाढलेले वजन बीएमआयच्या माध्यमातून कळू शकते. जाणून घेऊया वय आणि उंचीनुसार वजन किती असावे. याशिवाय बॉडी मास इंडेक्स कशा पद्धतीने मोजू शकता याबद्दल सविस्तर...

How to know body BMI : लठ्ठपणा ही एक वैद्यकीय स्थिती आहे. यामध्ये व्यक्तीच्या शरिराचे वजन गरजेपेक्षा अधिक वाढले जाते. याशिवाय शरिरात चरबी आणि अत्याधिक प्रमाणात फॅट्स जमा होतात. लठ्ठपणा आणि वाढलेले वजन बॉडी मास इंडेक्सच्या माध्यमातून मोजता येते. बीएमआय लठ्ठपणा आणि वाढलेल्या वजनाबद्दल कळण्याची एक सोपी स्क्रिनिंग पद्धत आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने बीएमआय कॅल्युलेट करुन उंची, वजन आणि वयाची माहिती देत शरिराचा बीएमआय जाणून घेऊ शकता.

बीएमआय आणि वजन

तुमच्या शरिराचा बीएमआय 30 पेक्षा अधिक असल्या अशा स्थितीला लठ्ठपणा म्हणतात. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक वाढली जाते.

लठ्ठपणाची कारणे काय?
सर्वप्रथम व्यक्ती दिवसातून किती कॅलरीज बर्न करतो हे फार महत्वाचे आहे. अथवा किती कॅलरीजचे सेवन करतो हे देखील पाहिले जाते. शरिराद्वारे वापर न केल्या जाणाऱ्या कॅलरीजचे रुपांतर फॅट्समध्ये होते. हेच लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे. खरंतर, लठ्ठपणा वाढण्याची हे पुरेसे कारण नाही. लठ्ठपणा वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे सध्याची बिघडलेली लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याची चुकीची पद्धत देखील आहे.

परिवारात एखादा व्यक्ती आधीपासूनच लठ्ठपणाचा सामना करत असल्यास अन्य व्यक्तीलाही लठ्ठपणा होण्याची शक्यता असते. काही आरोग्यासंबंधित समस्या जसे की, हायपोथायरायडिज्म, कुशिंग सिंड्रोम अथवा डिप्रेशनसारख्या स्थितीत व्यक्तीमधील मेटाबॉलिज्मची प्रक्रिया मंदावली जाते. यामुळेच व्यक्तीमध्ये लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते.

काहीजण लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिम आणि स्ट्रिक्ट डाएट फॉलो करुनही काही होत नाही. यामुळे वजन कमी करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ अथवा जिम ट्रेनरची मदत घेऊ शकता. खरंतर, शरिराच्या गरजेनुसार तुम्ही उंची आणि रुटीन फॉलो करावे असा सल्ला दिला जातो.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

मुलीला Good Touch आणि Bad Touch मधील असा शिकवा फरक

मंकीपॉक्सचा संसर्ग हवेतून होतो? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Share this article