Janmashtami 2024 Dahi Kala Recipe : येत्या 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहुतांजण उपवास ठेवत श्रीकृष्णासाठी पाळणा सजवून त्याची पूजा करतात. अशातच गोपाळकालासाठी दही काल्याची रेसिपी पाहूया.
Janmashtami 2024 Dahi Kala Recipe : येत्या 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करण्यासह उपवास केला जातो. एवढेच नव्हे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. यंदाच्या जन्माष्टमीला दही काल्याचा नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाला प्रसन्न करू शकता. जाणून घ्या दही काल्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर...
साहित्य
1 कप पोहे
1/2 कप दही
1 कप बारीक चिरलेली काकडी
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची
1 चमचा किसलेला नारळ
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
1 मोठा चमचा डाळींबाचे दाणे
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी साहित्य
1 चमचा तूप
1/2 चमचा राई
1/2 चमचा जीरे
हिंग
6-8 कढीपत्त्याची पाने
कृती
सर्वप्रथम पोहे एका भांड्यात काढून स्वच्छ धुवून घ्या. पोहे धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. पोहे 5-10 मिनिटे कोरडे होण्यासाठी ठेवा.
दुसऱ्या भांड्यात बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर, मिरची, किसेला नारळ, डाळींबाचे दाणे घ्या. यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर मिक्स करा.
सामग्रीच्या मिश्रणात भिजवलेले पोहे टाका आणि व्यवस्थितीत सर्व जिन्नस एकत्रित करा.
मंद गॅसवर एका पॅनमध्ये तूप गरम करा. या तूपात हिंग, राई, जीरे आणि कढीपत्ता टाकून फोडणी तयार करा.
दही काल्यासाठी तयार केलेली फोडणी पोह्याच्या मिश्रणावर टाका आणि सर्व सामग्री एकत्रित मिक्स करा.
दही काल्याची रेसिपी कृष्णाला नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील मंडळींना प्रसाद म्हणून द्या.
VIDEO : गोपाळकाल्यासाठी खास रेसिपी, पाहा संपूर्ण व्हिडीओ