
Mpox Virus Medical Expert Report : मंकीपॉक्सचा संसर्ग शिंकण्यातून निघणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून फैलावू शकते. पण मंकीपॉक्सचा संसर्ग मुख्यत: त्वचेच्या अथवा शारिरीक संपर्काच्या माध्यमातून होऊ शकतो. याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक माहिती देत म्हटले की, मंकीपॉक्सचा संसर्ग कोविड-19 प्रमाणे हवेत सहज फैलावला जात नाही.
मंकीपॉक्सची लक्षणे
मंकीपॉक्स एक व्हायरल जुनोटिक आजार असून मुख्य रुपात आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये आढळतो. अलीकडल्या काळात आफ्रिकामध्ये मंकीपॉक्सचा आजाराचा प्रकोप झाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत आफ्रिकेत 14 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली असून 524 जणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराची मुख्य लक्षणे ताप येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि त्वचेवर फोड येणे अशी आहेत.
श्वसनाच्या थेंबापासून फैलावण्याची शक्यता
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशननुसार, दीर्घकाळापर्यंत एकमेकांच्या समोर संवाद साधणे अथवा श्वास घेताना मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो. डब्लूएचओने असे म्हटले की, श्वसनाचे थेंब आणि लहान कणांच्या माध्यमातून मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो.
मंकीपॉक्सच्या हवेतील संसर्गाबद्दल अभ्यास
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की, DRC मधील मुलांमध्ये मंकीपॉक्स (एमपॉक्स) चा प्रादुर्भाव श्वसनमार्गाद्वारे विषाणूचा प्रसार होऊ शकतो. याशिवाय व्हेरिओला विषाणू (स्मॉलपॉक्स) हवेतून मोठ्या अंतरावर पसरू शकतो आणि वातावरणात मंकीपॉक्स विषाणू असल्याचेही दिसून आले आहे.
घरामधील संसर्गाची जोखिम
स्पेनच्या संशोधकांना आणखी एका अभ्यासात असे दिसून आले की, दुषित हवेतील खोलीत मंकीपॉक्सच्या संक्रमणाचा धोका अधिक वाढला जाऊ शकतो. पी. डी. हिंदुजा रुग्णालयातील पल्मोनोलॉजिस्ट आणि महारोग तज्ज्ञ डॉ. लांसलॉट मार्क पिंटो यांच्यानुसार, मंकीपॉक्स संसर्ग दीर्घकाळापर्यंत समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधण्यादरम्यान श्वसनाच्या मार्गाने फैलावू शकतो.
मंकीपॉक्सवरील लस
सध्या मंकीपॉक्सवर ठोस असे उपचार नाहीत. दरम्यान, बवेरियन नॉर्डिक एमवीए-बीएन लसीचा यावर वापर केला जात आहे. सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाने देखील मंकीपॉक्सवरील लस काढण्यासाठी विचार केला आहे. एसआयआयचे सीईओ अदार पूनावाला यांनी म्हटले की, पुढील वर्षापर्यंत लसीच्या विकासात सकारात्मक प्रगती होईल.
संक्रमणापासून असे रहा दूर
डॉ. दीपू यांच्यानुसार, मंकीपॉक्सचा फैलाव रोखण्यासाठी व्यक्तीने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्यापासून टाळावे. याशिवाय दररोज हात धुणे अथवा अस्वच्छ ठिकाणी जाऊ नये. अशाप्रकारे मंकीपॉक्सचा संसर्ग श्वसनाच्या थेंबांच्या माध्यमातून होऊ शकतो. पण कोविड-19 सारखा सहज होणारा आजार नाही. तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
आणखी वाचा :
श्रावणानंतर नॉन-व्हेज खाणार असल्यास या 5 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...
अंड की पनीर, कोणत्या पदार्थातून मिळते अधिक प्रोटीन?