सध्या मुलींना कुठे ना कुठेतरी स्वत:ला असुरक्षित वाटत आहे. बदलापूरमधील घटनेमुळे आता नागरिकांना आपल्या मुलींना घराबाहेर पाठवताना विचार करावा लागत आहे.
पालकांनी मुलींना गुड टच आणि बॅड टच कसे शिकवावे याबद्दल पुढे जाणून घेऊया….
मुलीला शरिराच्या अवयवांबद्दल जरुर सांगा. मुलीला प्रायव्हेट पार्टला एखाद्याने हात लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा विरोध करण्यासही सांगा.
मुलीला एखाद्या अज्ञात व्यक्तीने कितीही प्रेमाने काही खायला दिल्यास त्यासाठी थेट नकार देण्यास शिकवा. याशिवाय अंगाला स्पर्श करु देऊ नका.
पालकांनी आपल्या मुलीला सांगावे, एखाद्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यानंतर विचित्र वाटल्यास त्याला बॅड टच बोलतात.
एखाद्या व्यक्तीने डोक्यावर प्रेमाने हात लावल्यास त्याला गुड टच म्हणतात असे मुलीला शिकवावे. याशिवाय शब्बासकी देणेही गुड टच आहे.
मुलीला सांगावे की, कोणत्या व्यक्तींपासून दूर रहावे. एखाद्या व्यक्तीने जबरदस्तीने उचलून घेण्याचा प्रयत्न करणे, किस करणे या सर्व गोष्टी केल्यास त्या व्यक्तीपासून दूर व्हावे.
लहान मुलीला तिच्या सुरक्षिततेसाठी गुड टच आणि बॅड टचमधील अंतर समजावून सांगा. दररोज मुलीशी संवाद साधा.
आपल्यासोबत चुकीचे झाल्यानंतर मुली काही स्पष्टपणे सांगत नाही. अशातच पालकांनी मुलीच्या वागणूकीकडे लक्ष द्यावे.