Google Payच्या मदतीने करताय मोबाइल रीचार्ज? आकारली जाऊ शकते इतकी Convince Fees

Published : Dec 09, 2023, 03:45 PM ISTUpdated : Dec 09, 2023, 05:12 PM IST
Google Pay

सार

Mobile Recharge: गुगल पे सारख्या इंस्टेट पेमेंट अ‍ॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंटसाठी केला जातो. पण तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून मोबाइलचा रीचार्ज करता का? तर आधी ही बातमी संपूर्ण नक्की वाचा...

Convenience Fee on Mobile Recharge: तुम्ही इंस्टंट पेमेंट अ‍ॅप गुगल पे च्या माध्यमातून मोबाइल रीचार्ज करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, गुगल पे ने युपीआय (UPI)च्या माध्यमातून मोबाइल रीचार्जसाठी युजर्सकडून सुविधा शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत कंपनीकडून तीन रूपयांपर्यंतचा सुविधा शुल्क वसूल केला जाणार आहे.

 हा शुल्क अशा युजर्ससाठी लागू असणार आहे जे गुगल पे च्या माध्यमातून मोबाइलसाठी प्रीपेड प्लॅन (Mobile Prepaid Plan) रीचार्ज करतात. यापूर्वी गुगल पे च्या माध्यमातून मोबाइल रिचार्ज करताना कोणताही शुल्क आकारला जायचा नाही. युजर्सला केवळ टेलीकॉम ऑपरेटरकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांचे पेमेंट करावे लागत होते.

सुविधा शुल्क खरंच द्यावा लागतोय?
इंस्टाग्रामवरील अकाउंट Techy_Marathi जे तंत्रज्ञानाबद्दलची वेगवेगळी माहिती देतात. त्यांनी, गुगल पे सारख्या अन्य इंस्टंट पेमेंट अ‍ॅपच्या (Instant Payment App) माध्यमातूनही सुविधा शुल्क घेत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेय की, तुम्ही ऑनलाइन पेमेंट करताना गुगल पे चा वापर करता का? कारण गुगल पे कडून मोबाइल रीचार्जसाठी सुविधा शुल्क घेत आहे. हा सुविधा शुल्क तुमच्या रीचार्जच्या किंतमीवर अवलंबून आहे. तो एक ते तीन रूपयांपर्यंत असू शकतो.

आता काय करायचं? असा प्रश्न पडला असल्यास फोन पे (Phone Pay), पेटीअम (Paytm) सारख्या इंस्टेट पेमेंट अ‍ॅपवरून मोबाइल रीचार्ज करण्याचा विचार कराल. पण येथे सुद्धा आधीपासूनच सुविधा शुल्क घेतला जात आहे. यामुळे सुविधा शुल्क द्यावा लागू नये म्हणून तुम्ही जिओ (JIO), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea), एअरटेल (Airtel) सारख्या सिम कार्ड कंपन्यांच्या डिफॉल्ट अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाइल रीचार्ज करू शकता. येथे सुविधा शुल्क आकारला जात नाही.

VIDEO: गुगल पे वरून रिचार्च करताय? हा व्हिडीओ संपूर्ण पाहा

याशिवाय झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही 100 रूपयांचा रिचार गुगल पे च्या माध्यमातून करत असल्यास कोणत्याही प्रकारचा सुविधा शुल्क आकारला जाणार नाही. पण 100 ते 200 रूपयांवर 2 रूपये, 300 रूपये ते त्यापेक्षा अधिक किंमतीच्या मोबाइल रीचार्जवर सुविधा शुल्क 3 रूपये घेतला जाणार आहे.

आणखी वाचा: 

Deepfake Videos : डीपफेक व्हिडीओ कसा ओळखावा? या गोष्टी ठेवा लक्षात

50 हजार रूपयांमध्ये करा परदेशवारी, ही आहेत सर्वात स्वस्त-मस्त ठिकाणं

Aadhaar Card: PVC आधार कार्ड काढायंच? जाणून घ्या घरबसल्या अर्ज करण्याची प्रक्रिया

PREV

Recommended Stories

Horoscope 7 December : आज रविवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!
सोन्याला टक्कर! २०२६ मध्ये सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहतील 'हे' ८ इअररिंग्स; फॅशन आयकॉन बनण्यासाठी लगेच पाहा!