PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेत जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांनी दर्शवली पसंती

PM Narendra Modi : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरने कलेल्या सर्वेक्षणातील माहितीनुसार पंतप्रधान मोदींना तब्बल 76 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

 

Harshada Shirsekar | Published : Dec 9, 2023 9:09 AM IST / Updated: Dec 26 2023, 12:51 PM IST

PM Narendra Modi : जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. 

या सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी त्यांना आपली पसंती दर्शवली आहे. 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीदरम्यान ट्रॅक करण्यात आलेल्या डेटाच्या आधारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक देशातील नागरिकांकडून नोंदवण्यात आलेल्या मताच्या आधारे हा अंतिम निकाल ठरवला जातो.

हे आहेत टॉप 10 लोकप्रिय नेते

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या 76 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर 18 टक्के लोकांनी नापसंती दर्शवली आणि सहा टक्के लोकांनी याबाबत आपले मत नोंदवले नाही.

2. अँड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर (मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष) यांना 66 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे आणि 29 टक्के लोकांनी नापसंती दर्शवली आहे.

3. स्वीत्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेन बेर्सेट यांना 58 टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर नापसंती दर्शवणाऱ्यांनी संख्या 28 टक्के इतकी आहे.

4. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासियो लुला द सिल्व्हा यांना 49 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आणि 44 टक्के नापसंती दर्शवण्यात आली आहे.

5. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना 47 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे आणि नापसंती दर्शवणाऱ्यांची संख्या 42 टक्के इतकी आहे.

6. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी यांना 41 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. यानुसार त्या सहाव्या क्रमांकावर आहेत.

7. बेल्जिअमचे पंतप्रधान अलेक्झँडर डी क्रू यांना 37 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. पण 47 टक्के लोकांनी अलेक्झँडर डी क्रू यांना नापसंती दर्शवली.

8. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही 37 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली पण नापसंती दर्शवणाऱ्यांची संख्या 55 टक्के इतकी आहे.

9. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनाही 37 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवून 59 टक्के लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली.

10. आर्यलँडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांना 36 टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून 56 टक्के लोकांनी नापसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा

VIDEO : सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केल्यास होणार कडक कारवाई, पोलिसांनी जारी केले गाइडलाइन्स

श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 3 हजार VVIPना आमंत्रण, यादीत आहेत ही मोठी नावं

Javeria Khanum : जवेरियाचा भारतीय तरुणाला लव्हेरिया! आणखी एक पाकिस्तानी तरुणी होणार भारताची सून

 

Share this article