थंडीत शरिरातील Vitamin D ची कमतरता दूर करतील हे 4 ड्राय फ्रुट्स, फायदेही वाचा

Published : Dec 23, 2024, 01:19 PM IST
Vitamin D Rich Dried Fruits

सार

Vitamin D Dry Fruits : शरिरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी योग्य डाएट आणि लाइफस्टाइल फॉलो करावी. काही ड्राय फ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Vitamin D Dry Fruits : शरिरामध्ये व्हिटॅमिनचा स्तर संतुलित असणे फार महत्वाचे असते. सध्या थंडीचे दिवस सुरू असून बहुतांशजणांच्या शरिरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची समस्या उद्भवते. खरंतर, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून शरिराला व्हिटॅमिन डी मिळते. पण थंडीत पुरेसा सुर्यप्रकाश येत नसल्याने शरिराला व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात मिळत नाही. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे थकवा, सुस्ती येणे, हाड आणि स्नायू कमकुवत होऊ लागतात. अशातच व्हिटॅमिन डी ची थंडीतील कमतरता दूर करण्यासाठी पुढील काही ड्राय फ्रुट्सचे सेवन करू शकता.

अंजीर

अंजीरमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय कॅल्शियम आणि पोटॅशियमही असल्याने हाडांना बळकटी मिळते. अंजीरचे सेवन करणे हृदयासह संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

खजूर

खजूरमध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी भरपूर असते. यामुळे शरिरातील उर्जेचा स्तर कायम ठेवण्यास मदत होते. शरिरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज 2-3 खजूराचे सेवन करावे.

सुके अ‍ॅप्रिकोट

सुके अ‍ॅप्रिकोटचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय सुके अ‍ॅप्रिकोटमध्ये लोह आणि पोटॅशियमही असते. हाडांच्या बळकटीसाठी याचे सेवन करू शकता.

बदाम

दररोज भिजवलेल्या बदामाचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो. केसांसाठी बदाम अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन ई सह डी देखील असते. बदामामध्ये फायबर, प्रोटीन, कॉपर आणि मॅग्नेशियम असते. या सर्व पोषण तत्त्वांमुळे हाडं आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

थंडीत तयार करा आरोग्यासाठी गुणकारी मेथीचे लाडू, वाचा Recipe

कापसासारखा मऊ आणि जाळीदार होईल ढोकळा, वापरा या 7 Easy Hacks

PREV

Recommended Stories

घराचे नशीब बदलतील ही 6 रोपे, लावताच दिसेल सकारात्मक फरक
Horoscope 8 December : आज सोमवारचे राशिभविष्य, या राशीच्या काही लोकांना प्रत्यक्ष तर काहींना अप्रत्यक्ष मोठा धनलाभ!