Recipe : घरच्याघरी तयार करा कच्च्या हळदीचे लोणचे, थंडीत आजार पळतील दूर

Published : Dec 21, 2024, 02:51 PM IST
how-to-make-Raw-turmeric-pickle

सार

थंडीच्या दिवसात कच्च्या हळदीच्या लोणच्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया कच्च्या हळदीचे इस्टंट लोणचे कसे तयार करायचे याबद्दल सविस्तर...

Raw Turmeric Pickle Recipe : थंडीचे दिवस सुरू झाले असता अशा काही पदार्थांचे सेवन केले जाते ज्यामुळे शरीर आतमधून उष्ण राहण्यास मदत होईल. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाईल. अशातच यंदाच्या थंडीच्या दिवसात घरघरच्या घरी आरोग्यासाठी गुणकारी असे कच्च्या हळदीचे लोणचे तयार करू शकता. जाणून घेऊया रेसिपी स्टेप बाय स्टेप...

सामग्री

  • 250 ग्रॅम कच्ची हळद
  • 8-10 हिरवी मिरची
  • 4-5 चमचे लिंबाचा रस
  • 4 चमचे मोहरीचे तेल
  • 1 टिस्पून मेथी दाणे
  • 1 टिस्पून बडीशेप
  • 1 टिस्पून राई पावडर
  • 1 टिस्पून हळद
  • 1 टिस्पून हिंग
  • चवीनुसार मीठ

कृती

  • सर्वप्रथम कच्ची हळद स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. यानंतर लहान आकारात कच्च्या हळदीचे तुकडे करा.
  • एका कढईत मोहरीचे तेल गरम करता. तेलात मेथीचे दाणे, बडीशेप आणि हिंग घालून भाजून घ्या.
  • तेलात हळदीचे तुकडे आणि मिरची परतून घ्या. यानंतर राई पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घाला.
  • कढईमधून लोणचे एका झाकणबंद डब्यात काढून घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस घालून व्यवस्थितीत मिक्स करा.
  • पराठा, पुरी किंवा पोळीसोबत कच्च्या हळदीचे हेल्दी असे लोणचे खाण्यासाठी सर्व्ह करा.

कच्च्या हळदीचे फायदे

कच्च्या हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. याचे दररोज सेवन केल्याने वृद्धत्वाच्या समस्येपासूनही दूर राहू शकता.

आणखी वाचा : 

चहा पिताना या 5 चुका करणे टाळा, अन्यथा बिघडेल आरोग्य

नाश्तासाठी तयार करा मिक्स पिठाची इडली, वाचा रेसिपी

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!