हॉटेलसारखी व्हेज बिर्याणी स्टेप बाय स्टेप रेसिपी, तोंडाला सुटेल पाणी

Published : Apr 07, 2025, 03:11 PM IST
Bengaluru-mans-sues-restaurant-after-serving-chicken-biryani-without-chicken

सार

 Veg Biryani Recipe : हॉटेलसारखी घरच्याघरी व्हेज बिर्याणी कशी तयार करायची याची रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. 

Veg Biryani Recipe : दररोज वरण-भात खाऊन कंटाळा असाल तर रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलसारखी व्हेज बिर्याणी तयार करू शकता. पाहूया व्हेज बिर्याणीची स्टेप बाय स्टेप रेसिपी सविस्तर…

साहित्य: 

  •  भातासाठी:
  • बासमती तांदूळ – 2 कप 
  • पाणी – 5 कप 
  • मीठ – चवीनुसार 
  • 1-2 लवंगा
  • दालचिनीचा तुकडा
  • 1 वेलची 

 भाजीसाठी:

  • कांदा – 2 मध्यम (चिरून)
  •  टोमॅटो – 1 मोठा 
  • गाजर – 1
  • बटाटा –  
  • वाटाणे – ½ 
  • कप बीन्स – 5-6 (चिरून)
  •  आले-लसूण पेस्ट – 1 चमचा 
  • हिरवी मिरची – 1-2 (लांब चिरून) 
  • दही - ½ कप 
  • बिर्याणी मसाला – 2 चमचे 
  • हळद – ¼ चमचा 
  • लाल तिखट – 1 चमचा 
  • मीठ – चवीनुसार 
  • तेल किंवा तूप – 2-3 चमचे 
  • कोथिंबीर, पुदिना 

कृती: 

  • बासमती तांदूळ 30 मिनिटं भिजत घाला. पाणी गरम करून त्यात मीठ, मसाले (लवंग, वेलची, दालचिनी) टाकून तांदूळ शिजवा. थोडा अर्धा कच्चा भात शिजवून गाळून ठेवा.
  • कढईत तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परतावा. आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून परतावा. टोमॅटो, हळद, तिखट, बिर्याणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतवा. गाजर, बटाटा, बीन्स, वाटाणे घालून थोडंसं पाणी घालून भाजा शिजवा. नंतर त्यात दही घालून मिक्स करा. थोडं झाकून 5 मिनिटं शिजवा. शेवटी कोथिंबीर आणि पुदिना टाका. ३. बिर्याणी सेट करणे (लेयरिंग):
  • एका पसरट भांड्यात एक लेयर भाजीचा, एक लेयर भाताचा अशा लेयर्स तयार करा. दर लेयरवर थोडं तूप, पुदिना व कोथिंबीर शिंपडा. झाकण ठेवून मंद आचेवर 10-15 मिनिटे वाफवून घ्या.

PREV

Recommended Stories

फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!
घरीच पिकवा, ताजी खा! हिवाळ्यात कमी कष्टात आणि कमी जागेत येणाऱ्या 'या' ७ सुपर हेल्दी भाज्या!