लवंगाचे सेवन केल्याने वजन कमी होते?

सार

लवंगाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण लवंगाचे सेवन केल्याने वजन कमी होते का याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Clove Benefits : किचनमधील काही मसाले वजन कमी करण्यास मदत करतात. त्यापैकीच एक म्हणजे लवंग. याचा काही घरगुती उपायांसाठी वापर केला जातो. याशिवाय अन्नपदार्थांची चव लवंगामुळे वाढली जाते. खरंतर, लवंगाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दातासंबंधित समस्या उद्भवल्यासही लवंगाचा सर्वप्रथम उपाय केला जातो. पण वजन कमी करण्यासाठी खरंच लवंगाचे सेवन करणे फायदेशीर असते का याबद्दल पुढे सविस्तर जाणून घेऊ.

लवंगामुळे वजन कमी होते?

आरोग्य तज्ज्ञांनुसार, लवंगाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. पण वजन कमी करण्यासाठी लवंग सुपरफुड नाही हे लक्षात ठेवावे. वजन कमी करण्याच्या प्रवासात दररोज डाएटमध्ये लवंगाचा वापर करत असाल तर फायदा होऊ शकतो. याशिवाय वजन कमी करताना उद्भवणाऱ्या समस्या लवंगामुळे कमी होत वजनही घटले जाते.

असा होतो फायदा

वजन कमी करताना काहींना पचनासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. या व्यक्तींना अपचन किंवा ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. पण डाएटमध्ये लवंगाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. लवंग थंड असल्याने पचनासंबंधित समस्या दूर होऊ शकतात. दररोज लवंगाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारत वजन कमी होण्यास मदत मिळते.

लवंगाचे असे करा सेवन

वजन कमी करण्यासाठी लवंग वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. लवंगाची चहा, पाणी पिऊ शकता. दररोज तयार केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्येही लवंगाचा वापर करू शकता. याशिवाय घरच्याघरी तयार करण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक चुर्णातही याचा वापर करू शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Share this article